गांजाच्या वाहतूकप्रकरणी 25 लाखांचा मुद्देमाल केला जप्त:गुन्हे शाखा पथकाची बाभुळगाव तहसील समोर कारवाई

1 hour ago 1
एका आलीशान वाहनातून गांजाची वाहतूक केल्याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून मंगळवारी दि. २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीनंतर करण्यात आलेल्या या कारवाईत वाहनातून १२.३० लाखांच्या गांजासह सुमारे २५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील तहसील कार्यालयासमोर केली. या प्रकरणी सविस्तर असे की, कळंब वरून वाहन क्रमांक सीजी १२ एव्ही ०५१५ ही गाडी बाभुळगावकडे येत असून त्यामध्ये गांजा वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन या पथकाने बाभुळगाव शहरात रात्री सापळा रचला. त्यात समोरुन येणारे वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता वाहनामध्ये गांजा आढळून आला. त्यावरुन वाहनामधील शाहदत खान उस्मान खान (वय ६०) रा. रायगड, छत्तीसगड, सोहेल खान शहादत खान (वय २०) रा. रायगड, फरिदा खान शाहदत खान (वय ६०) रायगड, यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी गोपाल रा. झरसुगुता. ओरिसा, सलीम रा. नेरपांसोपंत, यवतमाळ यांची नावे सांगितली. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी जवळून १३ लाख रुपयाची हुंडई क्रेटा कार आणि १२ लाख ३० हजार रुपयाचा गांजा व १८ हजार रुपयाचे तीन मोबाईल असा एकूण २५ लाख ४८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुगत नाथराव पुंडगे यांनी बाभुळगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असून अधिक तपास बाभूळगाव येथील पोलिस करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article