गांधीजींच्या विचारांना आजही महत्त्व:स्वातंत्र्य चळवळीपासून सामाजिक समतेपर्यंत महात्मा गांधींचे योगदान अविस्मरणीय

7 hours ago 2
अमरावती जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन येथे विशेष अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी गांधीजींच्या कार्याचा आढावा घेतला. देशमुख यांनी सांगितले की, महात्मा गांधींनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतः या तत्त्वांनुसार जीवन जगले आणि इतरांनाही या मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दिला. खेड्यांमध्ये खऱ्या भारताचे मूळ असल्याचे सांगून त्यांनी खेडी स्वयंपूर्ण करण्याचा संदेश दिला. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर गांधीजींनी अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतले. यामध्ये गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्वधर्मसमभाव आणि अस्पृश्यता निवारण यांचा समावेश होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशभरात स्वराज्यासाठी त्यांनी जनआंदोलन उभे केले. अहिंसात्मक असहकार आंदोलन आणि सविनय सत्याग्रहासारख्या अभिनव मार्गांद्वारे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला नवी दिशा दिली. कार्यक्रमात शहराध्यक्ष बबलू शेखावत, प्रकाश काळबांडे, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रयागराज कुंभमेळ्यातील दुर्दैवी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ४२ भाविकांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article