तुम्हाला सरकारी नोकरीची चांगली संधी आहे. गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश पदांच्या 212 जागा आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 77,840 ते 1,36,520 रुपये वेतन मिळेल. विशेष म्हणजे तुम्हाला चांगली संधी आहे. तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.
दिवाणी न्यायाधीश व्हायचे असेल तर संधी चांगली आहे. गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश पदासाठी भरती 2018 या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गुजरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळ gujarathighcourt.nic.in. यावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश पदासाठी 1 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, जी 1 मार्चपर्यंत चालणार आहे. दिवाणी न्यायाधीश पदांसाठी पहिली पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे. ही परीक्षा 23 मार्च रोजी होणार आहे. त्याचप्रमाणे दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा 15 जून रोजी होणार आहे.
दिवाणी न्यायाधीश अर्ज
गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीशांच्या भरतीसाठी अर्ज करू शकणारा, उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय प्रवीणता परीक्षा स्थानिक भाषेत (गुजराती) उत्तीर्ण असावी.
वयाचा विचार करता या पदांसाठी अर्ज करण्याचे कमाल वय 35 वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा जास्तीत जास्त 38 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
गुजरात उच्च न्यायालयात दिवाणी न्यायाधीश पदासाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना 2000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती, जमाती, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासप्रवर्ग, अपंग व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शुल्क 1000 रुपये असेल.
दरमहा 77,840-1,36,520 रुपये वेतन
गुजरात उच्च न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश पदावर निवड झाल्यानंतर उमेदवारांना दरमहा 77,840-1,36,520 रुपये वेतन मिळेल.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी वयोमर्यादा किती?
अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा सामाजिक किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा जास्तीत जास्त 38 वर्ष निश्चित करण्यात आली आहे.
भरतीसंदर्भातील ठळक मुद्दे
- दिवाणी न्यायाधीश पदांच्या 212 जागा
- अर्ज प्रक्रिया सुरू, 1 मार्चपर्यंत चालणार
- पूर्व परीक्षा 23 मार्च रोजी होणार
- दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा 15 जून रोजी होणार
- दरमहा 77,840-1,36,520 रुपये वेतन
- अर्ज करण्याचे कमाल वय 35 वर्ष निश्चित