महाकुंभ मेळाव्यात आतापर्यंत तीन अमृत स्नान पूर्ण झालेत आणि आता आखाडे हळूहळू खाली होण्यास सुरुवात झालेली आहे. महाकुंभातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असलेले नागा साधू कुंभ संपल्यानंतर कुठे जातात. अमृत स्नानासाठी लाखोंच्या संख्येत आलेले नागा साधू नंतर कोठे गायब होतात? निरंजन आखाड्याच्या नागा बाबा दिगंबर दर्शन गिरी महाराजांनी एका खाजगी चॅनलशी बोलताना नागा साधूंच्या निर्गमनाबद्दल माहिती दिलेली आहे. दिगंबर दर्शन गिरी जी महाराज म्हणाले की आतापर्यंत तीन अमृत स्नान झाली आहेत. उद्याचे एक स्नान शिल्लक आहे. गुरु भाई स्वतंत्र स्नान करण्यासाठी जातात जे त्रिवेणी संगमात होते. त्यानंतर ते छावणीत परत येतात. त्यानंतर पंच परमेश्वरची प्रक्रिया सुरु होते. ७ तारखेला पूजा आणि हवन केल्यानंतर जो नवा पंच निवडला जातो. त्याची निवड करून मग आम्ही काशीच्या दिशेने निघतो.
काशीत आमचे स्थायी स्वरुपाचे आखाडे आहेत. तेथे शिवरात्रि मेला आणि मसानची होळी खेळून आम्ही आपआपल्या गंतव्य स्थानी निघतो. ते पुढे म्हणाले की शिवरात्रि आणि होळी नागा बाबांची काशीत होते. तेथे आम्ही महादेवाचा अभिषेक करुन आखाड्यात परततो. होळी खेळल्यानंतर आम्ही हरिद्वाराच्या दिशेने निघतो. नागा संन्याशी संपूर्ण भारतात जागो जागी रहातात. देशाच्या वेगवेगळ्या काही साधू त्यांच्या गुरुच्या आखाड्यात सेवा करतात. कोणी हिमालय, केदारनाथ, बद्रीनाथ, हिमाचल,जम्मू -कश्मीर ,नर्मदाखंड तर कोणी नेपाळमध्ये जातो. जिकडे त्यांचे स्थानिक आखाडे आहेत तिकडे ते जातात. जेथे त्यांची ओढ असते तिकडे ते जातात. म्हणजे चारी दिशांना पसरले जातात.
हे सुद्धा वाचा
धर्माचे रक्षण करणे आमचे काम – दिगंबर दर्शनगिरीजी महाराज
नागा साधू यांना पराक्रमी म्हटले जाते. असे काय आहे नागा साधूमध्ये जे लोकांना माहिती नाही ? असे विचारले असतात दिगंबर दर्शन गिरीजी महाराज म्हणाले की,’ आदिकाळात इंग्रज आणि मुघलांचे शासन होते. या राजाच्या काळात जेव्हाही कधी धर्मावर आक्रमण झाले तेव्हा नागांनी लढाई लढून आपले बलिदान दिले आहे आणि धर्माच्या रक्षणासाठी नागासाधू बनले. भाला, त्रिशूल, धनुष्य, गदा, तलवार चालविण्याचे प्रशिक्षण देखील असते. धर्मासाठी बलिदान देणे त्यांचा धर्म आहे.मी सवा लाख रुद्राक्ष धारण केले आहेत. हा भगवान शंकराचा आशीर्वाद आहे.’