गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा, लेकीबाळींची सुरक्षा अंबाबाईच्या भरोशावर:पुणे लैंगिक अत्याचार प्रकरणावर सुषमा अंधारे भडकल्या

2 hours ago 1
राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूरनंतर आता पुण्यात देखील दोन चिमुकल्या दोन मुलींवर शाळेच्या बसमध्ये चालकानेच लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी चालकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकारावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या, माझ्या गृहमंत्र्यांकडून आता शून्य अपेक्षा आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारचे आवाहन किंवा विनंती करावी वाटत नाही. बदलापूर घटनेनंतर तब्बल 12 अशा घटना राज्यात घडल्या आहेत. स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा आज नवरात्री उत्सवाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी अशी घटना घडली, असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, गृहमंत्र्यांचा राजीनामा देखील आता मागावा वाटत नाही. कारण आता पंधरा-वीस दिवस बाकी आहेत. अंबाबाईला प्रार्थना करते की, आता लेकीबाळी या तुझ्याच भरोशावर आहेत. हे राज्य सरकार तुझ्या लेकीबाळीला अजिबात सुरक्षा देऊ शकत नाही. असे म्हणत त्यांनी गृहमंत्री व महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारे पुण्यात घडलेल्या प्रकरणावर बोलताना म्हणाल्या, काही बसेस शाळेकडून असतात तर काही खाजगी असतात. खाजगी बसेसचा खर्च कमी असतो, त्यामुळे बचत करण्याच्या नादात खाजगी बसेस निवडल्या जातात. अनेकवेळा विद्यार्थ्यांना सोडताना लेडीज स्टाफ नसतात. पालकही खाजगी बसेस असल्यामुळे बोलू शकत नाहीत. पुण्यातील संतापजनक घटना शाळेच्या बस चालकाने 8 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुणे येथील वानवडी भागात घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत 45 वर्षीय आरोपी चालकाला अटक करण्यात अली आहे. 30 सप्टेंबर रोजी शाळा बसचालक विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत पोहोचला. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी सोडताना त्याने आठ वर्षांच्या दोन पिडीत मुलींना बसच्या केबिनमध्ये बोलावले आणि त्यांच्यासमोर अश्लील चाळे केले. या बाबतची माहिती एका मुलीने पालकांना सांगितली व यामुळे ही घटना उघडकीस आली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article