लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे. File Photo
Published on
:
21 Nov 2024, 8:04 am
Updated on
:
21 Nov 2024, 8:04 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कथित सौरऊर्जा कंत्राट लाच प्रकरणी उद्योगपती गौतम अदानी आणि इतरांवर अमेरिकेतील कोर्टात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. यावरून आज (दि.२१) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी यांच्या अटकेची मागणी केली आहे. ते दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.
अदानी आणि पीएम मोदींवर थेट हल्लाबोल
ते पुढे म्हणाले की, हा मुद्दा संसदेत मांडणार आहे. विरोधी पक्षनेता म्हणून हा मुद्दा मांडण्याची जबाबदारी माझी आहे. या प्रकरणी जेपीसीकडून चौकशी होण्याची गरज आहे. तसेच गौतम अदानींना अटक करण्याची आमची मागणी आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांचे अदानींना संरक्षण मिळत आहेत.
आता हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे की, अदानीने भारतीय कायदा आणि अमेरिकन कायदा दोन्ही मोडले आहेत. त्याच्यावर अमेरिकेत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मला आश्चर्य वाटते की अदानी या देशात मुक्तपणे कसे काय फिरू शकतात. अदानीने उघडपणे २ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. कदाचित इतरही अनेक घोटाळे केले आहेत, पण ते राजरोसपणे फिरत आहे. पंतप्रधान अदानींना संरक्षण देत आहेत आणि पंतप्रधान अदानीसोबत भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, असाही आरोप गांधी यांनी यावेळी केला .
राहुल गांधींना हसू आवरता आले नाही
राहुल गांधी आज दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पोहोचले, जिथे त्यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राहुल बोलत असताना अचानक दिवे गेले. काँग्रेस कार्यालयात काही सेकंदांसाठी अंधार पसरला होता. अचानक दिवे गेल्यावर राहुल गांधींना आपले हसू आवरता आले नाही आणि ते जोरजोरात हसू लागले. ५ सेकंदांनंतर वीज परत आली. त्यानंतर सर्वकाही सामान्य झाले.
#WATCH | Delhi: When asked if a review of Adani projects in Opposition-ruled states should also be done, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "...Wherever there is corruption, investigation should be done. But investigation will begin with Adani. Unless he is arrested, it won't be… pic.twitter.com/ZOW3oOt9sF
— ANI (@ANI) November 21, 2024