RBI Cuts Repo Rate New EMI Calculator : आयकरात मोठा दिलासा दिल्यानंतर मध्यमवर्गाला अजून एक मोठा सुखद धक्का मिळाला आहे. RBI ने जवळपास 5 वर्षानंतर रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. त्यानंतर गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि व्यावसायिक कर्जात मोठी कपात होणार आहे. ही कर्जे स्वस्त होणार आहेत. याशिवाय सध्या कर्जाचा डोईवर बोजा असणाऱ्या कर्जदारांचा EMI पण कमी होणार आहे. त्याचा थेट परिणाम होम , कार कर्ज आणि इतर ग्राहकांवर दिसून येईल.
रेपो दर दोन वर्षानंतर हलला
यापूर्वी 4 ते 6 डिसेंबर 2024 दरम्यान जैसलमेर येथे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) पतधोरण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी सुद्धा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी 2023 पासून रेपो दरात कुठलाही बदल न करण्याचे धोरण कायम ठेवले होते. पण आता रेपो दर हलला आहे.
हे सुद्धा वाचा
सर्वसामान्यांना मोठा दिलासा
अनेक वर्षांपासून गृहकर्जावरील हप्ता कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. तर आरबीआय आणि पतधोरण समितीवर त्यासाठी मोठा दबाव होता. या समितीमधील काही सदस्यांनी रेपो दर कपातीचा आग्रह सुद्धा धरला होता. केंद्र सरकार पण रेपो दर कपातीसाठी आग्रही होते. पण आरबीआय हा निर्णय घेण्यास धजत नव्हते. तर संजय मल्होत्रा यांनी आरबीआय गव्हर्नरचा पदभार सांभाळताच पहिल्यांदा सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला.
गृहकर्जावर असा मिळेल फायदा
समजा गृहकर्ज रक्कम 25,00,000 आहे
कर्जाचा कालावधी 20 वर्षे आहे
व्याज दर 8.75%
तर सध्या EMI 22,093 रुपये आहे
जाणून घ्या Home Loan EMI किती होईल कमी
गृहकर्ज रक्कम : 25,00,000
कर्ज कालावधी : 20 वर्षे
नवीन व्याज दर : 8.5%
नवीन EM I: 21,696 रुपये
कार कर्ज इतके होईल कमी
ऑटो कर्ज रक्कम : 8,00,000
कर्ज कालावधी : 7 वर्षे
सध्याचा व्याज दर: 9.05%
सध्याचा EMI: 12,892 रुपये
जाणून घ्या किती होईल Car Loan कमी
ऑटो कर्ज रक्कम : 8,00,000
कर्ज कालावधी : 7 वर्षे
नवीन व्याज दर : 8.8%
नवीन EMI : 12,790 रुपये