Green Tea (ग्रीन टी) पिण्याचे अनेक फायदे आहेत पण त्यासोबतच अनेक तोटे देखील आहेत. अशा परिस्थितीत, Green Tea चे सेवन किती प्रमाणात हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कधीकधी जास्त प्रमाणात Green Tea प्यायल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्याने त्वचेवर अॅलर्जी होऊ शकते. ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने पचनाच्या समस्या जसे की पित्त, गॅस आणि पोटदुखी यांसारखे आजार उद्भवू शकतात . त्यामुळे Green Tea चे सेवन प्रमाणात करावे अन्यथा ही सवय तुमच्या पोटासाठी धोकदायक ठरू शकते.
चहा किंवा कॉफीप्रमाणेच Green Tea मध्येही कॅफीन असते. दिवसभर कॅफीनचे जास्त सेवन केल्याने डोकेदुखी, आळस, चिंता, चिडचीड यासह अन्य हानिकारक दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. त्यामुळेच Green Tea चे सेवन प्रमाणात करणे आवश्यक आहे.
लोहाचे शोषण कमी
Green Tea चे जास्त सेवन केल्याने शरीरात लोहाचे शोषण कमी होते. Green Tea मध्ये पॉलीफेनॉल असतात, जे लोहाचे शोषण कमी करू शकतात.
दातांच्या समस्यांना आमंत्रण
Green Tea मध्ये टॅनिन असते, जे दात खराब करू शकतात आणि दातांच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
उच्च रक्तदाबासारख्या समस्या
Green Teaचे जास्त सेवन केल्याने उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
झोप उडेल
तसेच Green Tea चे जास्त सेवन केल्याने झोप न येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
(वैद्यकीय सल्ला: कोणतेही प्रयोग करण्यापूर्वी ते आपल्या फॅमेली डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांना विचारून करणे आवश्यक आहे.)