सेन्सेक्स, निफ्टी आज घसरणीसह बंद झाले. झाले.(file photo)
Published on
:
07 Feb 2025, 10:41 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:41 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर संजय मल्होत्रा यांनी आज शुक्रवारी (दि.७) कर्जदारांना मोठा दिलासा देत रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सच्या कपातीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. शेअर बाजार आज सलग तिसऱ्या दिवशी घसरून बंद झाला. सेन्सेक्स १९७ अंकांनी घसरून ७७,८६० वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४३ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २३,५५९ वर स्थिरावला.
क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी मेटल निर्देशांक २.६ टक्के वाढला. तर कन्झ्यूमर ड्युराबेल्स १ टक्के आणि ऑटो निर्देशांकाने ०.७ टक्के वाढ नोंदवली. तर दुसरीकडे पीएसयू बँक, एफएमसीजी, मीडिया, ऑईल अँड गॅस निर्देशांक प्रत्येकी १ टक्के घसरले.
आरबीआयचे पतधोरण जाहीर होण्यापूर्वी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स- निफ्टी सपाट पातळीवर राहिले. पण पतधोरण जाहीर केल्यानंतर त्यात चढ-उतार दिसून आला. विशेषतः व्याजदराशी संबंधित क्षेत्रात संमिश्र प्रतिसाद राहिला. मेटल आणि ऑटो शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर बँकिंग आणि फायनान्सियल शेअर्समध्ये घसरण झाली.