Published on
:
07 Feb 2025, 10:42 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:42 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - अभिनेत्री आणि माजी ब्युटी क्वीन इशिका तनेजा साध्वी बनण्याची घोषणा करून चर्चेत आलीय. ती २०१७ मध्ये निर्माता मधुर भंडारकरच्या इंदु सरकार चित्रपटात दिसली होती. विक्रम भट्ट यांच्या सीरीज 'हद' मध्ये देखील काम केलं होतं. आता इशिकाने स्वत:ला अध्यात्मिकता आणि सनातन धर्माच्या प्रचार यासाठी समर्पित करून ग्लॅमरस इंडस्ट्रीला अलविदा म्हटलं आहे.
काही चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओमध्ये ती दिसली होती. इशिका तनेजाने शोबिज सोडल्याची आणि 'साध्वी' होऊन अध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. २९ जानेवारी रोजी मौनी अमावस्येच्या निमित्ताने महाकुंभ मेळ्यात ती गेली होती. तिथे तिने पवित्र स्नान करून अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याची घोषणा केली. स्नान केल्यानंतर तिने सनातन मार्गावर चालण्याची थपथ घेतली आणि युवा, महिलांना देखील आवाहन केले.
याआधी जानेवारीमध्ये इशिकाने मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वतीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली तिने गुरु दीक्षा घेतली होती.