सासू-सुनेला घरात घुसून बेदम मारहाणPudhari
Published on
:
07 Feb 2025, 10:29 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:29 am
राहुरी: तुम्ही शिविगाळ करू नका, आमचे माणसं घरात नाही, असे सांगुनही दोघांनी शिवीगाळ करून सासू व सुनेला बेदम मारहाण केल्याची घटना वांबोरी येथे घडली.
वांबोरी येथील अनिता बोरकर यांनी तक्रारीत म्हटले की, भाऊसाहेब शेळके व राहुल शेळके हे दोघे बंधू 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास घरात घुसले. त्यावेळी अनिता बोरकर यांसह सासू उषा बोरकर या स्वयंपाक करीत होत्या. भाऊसाहेब व राहुल यांनी अनिता यांना तुझा नवरा कोठे आहे? अशी विचारण करीत शिविगाळ केली.
यावेळी आम्हाला शिविगाळ करू नका, आमचे माणसं घरात नाही, असे सांगून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा राग आल्याने दोन्ही शेळके बंधुंनी अनिता व सासू उषा यांना शिविगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच अनिता बोरकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नुकसान केले. आमच्या नादी लागले तर जीवे मारून टाकू अशी धमकी देत शेळके बंधुंनी दहशत निर्माण केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.