Published on
:
07 Feb 2025, 10:40 am
Updated on
:
07 Feb 2025, 10:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यातील टायगर पॉइंटजवळ झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले. हा प्रकार आज (दि.७) समोर आला आहे. याबाबतचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अण्णा गुंजाळ असे मृत पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. मात्र, तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्क ही होत नव्हता. दरम्यान, आज त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
टायगर पॉइंटजवळ त्यांची गाडी आढळून आलेली आहे. या गाडीत एक डायरी आहे. कदाचित या डायरीमधून काही माहिती मिळू शकते. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचलेले असून खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.