तिसरीतील विद्यार्थी कविता सादर करत असताना शिक्षणमंत्री दादा भुसे कौतूकाने पाहत होते. Pudhari Photo
Published on
:
07 Feb 2025, 1:52 pm
Updated on
:
07 Feb 2025, 1:52 pm
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा रोजच्या प्रमाणे सकाळी सुरु झाली. शालेय प्रार्थना व पाठ होत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेच्या पाहणीसाठी शाळेत पोहोचतात.
शिस्तीत शाळेच्या ओट्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जातात. वडीलकीच्या नात्याने मुलांची चौकशी करतात. मुख्याध्यापिका विजया गोतमारे विश्वासाने पुढे येतात. शाळेची संपूर्ण माहिती त्या देतात. शिक्षणमंत्री इयत्ता तिसरीतील मुलींशी गप्पांमध्ये रमून जातात. त्यांना एक-एक प्रश्न विचारत शाळेतल्या अडचणी जाणून घेतात. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी ‘सर मी कविता वाचून दाखविते असे सांगून लय धरते आणि शिक्षणमंत्री भुसे देखील ती ऐकत राहतात.
कळमेश्वर येथील नगर परिषदेची शाळा, नागपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत कळमना संजय नगर येथील हिंदी उच्च प्राथमिक शाळा याठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी शिक्षण उपसंचालक दिपेंद्र लोखंडे व वरिष्ठ अधिकारी होते.