मनसेच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
लातूर (Agriculture Exhibition) : गेल्या ५ ते ७ वर्षापासून मराठवाडयातील शेतकरी कधी कोरड्या तर कधी ओल्या दुष्काळाला सामोरा जात आहे. सततच्या हवामानातील बदलामुळे कधी पाऊसच नाही तर कधी जास्तीचा पाऊस, अशी विचित्र परिस्थिती झाल्याने कोणतेच पीक मराठवाडयातील शेतकर्यांच्या हाती लागायला तयार नाही. त्यामुळे मराठवाडयातील शेतकरी कर्जबाजारी होऊन वैफल्यग्रस्त झाला आहे, असे प्रतिपादन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व लातूर कृषी नवनिर्माण अॅग्रो प्रोड्युसर कंपनी नरवटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या परिसरात शुक्रवार, दिनांक ७ ते ११ फेब्रुवारी २०२५ दरम्यान कृषी नवनिर्माण २०२५ या राज्यस्तरीय तिसर्या कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाच्या (Agriculture Exhibition) उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून पाशा पटेल बोलत होते.
सध्या सगळीकडे तापमानामध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे हवेतील गारवा संपत आलेला आहे. तसेच तापमानाची वाढ थांबवायची असेल तर लोखंड, वीज याचा वापर कमी करावा लागेल आणि तापमानातील वाढ थांबवण्यासाठी बांबूसह इतर झाडे लावले पाहिजेत, असा जालीम उपायही पटेल यांनी बोलताना सांगितला. यावेळी (Agriculture Exhibition) काँग्रेसचे नेते अभय साळुंखे म्हणाले की, रस्त्यावर काम करण्याचा डोंगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उचललेला आहे. एवढी मोठी यंत्रणा जमवणे सोपं नाही. ते मनसेने करून दाखवले आहे. त्यामुळे सरकारने स्वतः पुढे येऊन अशा कार्यक्रमाला मदत करणे गरजेचे आहे.
या मनसेच्या कृषी प्रदर्शनाच्या (Agriculture Exhibition) सुरुवातीला मनसेचे महाराष्ट्र शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी प्रास्ताविक केले. प्रदर्शन संपताच लातूर जिल्ह्यात शेतीचा दवाखाना येत्या महिनाभरात सुरुवात करणार असल्याचे सांगितले. याची सुरुवात रेणापूर तालुक्यातून करून संपूर्ण राज्यभर शेतीचा दवाखाना हा उपक्रम राबविण्यात येईल, असे ते म्हणाले.
या (Agriculture Exhibition) कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरकार, मनसे शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष नमाज आली, बीड जिल्हाध्यक्ष सुमन धास, हिंगोली जिल्हाध्यक्ष बंडू कुटे, दिलीप गायकवाड, प्रशांत बारई आदी उपस्थित होते. तर व्यासपीठावर भागवत शिंदे, रेखा नागराळे, डॉ. नरसिंह भिकाणे, शिवकुमार नागराळे, संजय राठोड, मनोज अभंगे, रवी सूर्यवंशी, रणवीर उमाटे, सचिन शिरसाट, किरण चव्हाण, प्रीती भगत, भागवत कांदे, अंकुश शिंदे, पांडुरंग कदम, वाहेदभाई शेख, बाळासाहेब मुंडे, महेश देशमुख, सोमनाथ कलशेट्टी आदींची उपस्थिती होती.