चीनमधील वस्तू म्हणजे ‘चली तो चांद तक नही तो रात तक’ असे उपहासिकपणे म्हटले जाते. आजकाल ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड आहे. अनेक जण त्यांच्या गरजेच्या वस्तू ऑनलाईन मागवतात. अमेरिकेतील जॉर्जिया येथील 68 वर्षीय सिलवेस्टर फ्रँकलिन यांना ड्रिल मशीन हवे होते. त्यांनी चीनमधील एका ऑनलाईन ई-कॉमर्स साईट अली एक्सप्रेसवर ड्रिल मशीन पाहिले. त्याची खातरजमा केल्यावर त्यांनी 40 डॉलर म्हणजे 3400 रुपयांहून अधिक रक्कम मोजली. पार्सल सुद्धा घरी आले. पण ते उघडताच त्यांनी डोके झोडून घेतले.
बॉक्स उघडताच झटका
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, जॉर्जियातील 68 वर्षाचे सिलवेस्टर फ्रँकलिन (Sylvester Franklin) यांनी नोव्हेंबरमध्ये अली एक्सप्रेसवरून एक ड्रिल मशीन आणि प्रेशर वॉशर ऑर्डर केले होते. या दोघाचे बिल 40 डॉलर (3400 रुपयांहून अधिक) झाले होते. 9 डिसेंबर रोजी त्यांच्याकडे चांगला मोठा बॉक्स आला. या पार्सलमध्ये दोन्ही वस्तू असतील असे त्यांना वाटले. त्यांनी उत्साहाने पार्सल उघडले. पण पार्सल उघडताच त्यांना धक्का बसला. त्या पार्सलमध्ये ड्रिल मशीन तर होती, पण केवळ फोटोत, हो. कंपनीने त्यांना केवळ ड्रील मशीनचा फोटो पाठवला होता.
हे सुद्धा वाचा
नाशिकमध्ये शेतकर्यांना गंडा, PM किसान योजना स्कॅम, लिंक उघडताच खात्यातील पैसे गायब, राहा सावध, होऊ नका सावज
बस्स झालं, बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या, कोर्टाचा दरवाजा ठोठावणार, सुजय विखे यांनी संतापाला मोकळी करुन दिली अशी वाट
Syros चा बाजारात धुमाकूळ, लॉन्चिंगच्या पहिल्याच महिन्यात 25,025 वाहनांची विक्री, रिपोर्ट वाचा
मारुती ब्रेझा किती रंगांमध्ये उपलब्ध? कार खरेदीपूर्वी ही बातमी नक्की वाचा
कंपनीला शिव्या हासडल्या
सिलवेस्टर एक मॅकेनिक आहे. ते सेवा निवृत्त झाले आहेत. पार्सल उघडल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. कंपनीने ड्रील मशीनची केवळ फोटोकॉपी पाठवल्याने ते संतापले. त्यांनी कस्टमर केअरवर कॉल केला आणि त्यांचा समाचार घेतला. त्यांनी सर्व रक्कम परत करण्याची मागणी केली. पण कंपनीने अजूनही त्यांचे पैसे परत केले नसल्याने त्यांनी कायदेशीर मार्ग निवडण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण सेवा निवृत्त असून इतकी मोठी रक्कम खर्च करून वस्तू मागवली होती. त्यातही फसवणूक केल्याने ते कंपनीवर संतापले आहेत. एकतर वस्तू द्यावी अथवा पैसे परत करावे अशी मागणी त्यांनी कंपनीकडे केली आहे. त्यांनी कंपनीकडे तक्रार नोंदवली आहे. पण कंपनीने अजून त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. कंपनीच्या फसवणुकीविरोधात ते दाद मागणार आहेत.