Published on
:
07 Feb 2025, 8:35 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:35 am
सिंधुदुर्ग - प्रयागराज मध्ये कुंभमेळ्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक जातात. मात्र सिंधुदुर्गवासीयांना जाण्यासाठी रेल्वेची सोय नसल्यामुळे जाता येत नाही. यासाठी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून कोकण रेल्वे मार्गावरून प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांना सावंतवाडी व कणकवली येथे थांबा देण्याची मागणी केली आहे.
खासदार राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यासंदर्भात पत्र लिहून महाकुंभसाठी दिलेल्या गोवा ते प्रयागराज या रेल्वे सेवेबद्दल अभिनंदन केलं आहे.फेब्रुवारी महिन्यात तीन दिवस ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात या रेल्वेला एक ही थांबा नसल्याने सिंधुदुर्गवासीयात नाराजी असल्याने जिल्हा वासियांना कुंभमेळ्यात जाण्यासाठी सावंतवाडी व कणकवली रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा, अशी विनंती खासदार नारायण राणे यांनी केली आहे.