Devendra Fadnavis connected Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दीर्घ कालावधीनंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदार यादी आणि व्होटिंग पॅटर्नमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप केला. पाच वर्षे नाही, पाचच महिन्यांत मतदारांची लाट कशी आली? महाराष्ट्रात एवढे मतदार वाढले कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मजेशीर उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, ‘एकही चुटकुला बार बार सुनाया जाए तो उसपर हसां नहीं करते’, असे एका वाक्यात उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीची प्रचंड लाट दिसून आली. त्यात भाजपला १३२ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ तर शिवसेनेला ५७ जागा मिळाल्या होत्या. महायुतीने एकूण २३० जागा मिळाल्या. त्याचवेळी महाविकास आघाडीला एकूण केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागले. त्यात शिवसेना (उद्धव ठाकरे) या पक्षाला २०, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला १० तर काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या. महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या या पराभवानंतर राहुल गांधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर प्रश्न उपस्थित केले.
हे सुद्धा वाचा
जब एक ही चुटकुला बार-बार सुनाया जाए तो उसपर हंसा नहीं करते!#RahulGandhi @RahulGandhi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 7, 2025
आयोगाने यापूर्वी दिले उत्तर
राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले. ‘एकही चुटकुला बार बार सुनाया जाए तो उसपर हसां नहीं करते’, असा टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेवर देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील वाढलेल्या मतदानावर राहुल गांधी यांनी आरोप केले आहे. त्या आरोपांवर यापूर्वीच निवडणुक आयोगाने उत्तर दिले आहे. किती मतदार वाढले, कुठे मतदार वाढले, कसे मतदान झाले आहे, हे सर्व आयोगाने स्पष्ट केले आहे.
राहुल गांधी यांना समर्थन मिळणार नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार आहे. त्यामुळे काऊंटर फायर करण्यासाठी राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणूक निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नामोनिशाना मिटणार आहे. त्यांनी सर्वत्र काँग्रेसच्या होणाऱ्या परभवाचे आत्मचिंतन करावे. राहुल गांधी यांना जनतेचे समर्थन कधीच मिळणार नाही. त्यांना वेगळे उत्तर देण्याची गरज नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.