पोलिसांच्या एका निर्णायक भूमिकेमुळे बीडमधील नागरिकांमध्ये सुरक्षेचा भाव निर्माण झाला आहे. पोलिसांचा हा प्रयत्न गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहे. पुढील काळात या कारवाईचे परिणाम काय असतील हे पाहणे महत्त्वाचे आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे अॅक्शन मोडवर आलेले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ८० जणांची चौकशी नवनीत कौवत यांनी केली आहे. अधीक्षकांनी ८० जणांना अधीक्षक कार्यालयामध्ये बोलावून तंबी दिली आहे. दिवसेंदिवस बीड जिल्ह्यामधील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी ॲक्शन मोडवर येत एकूण ८० जणांची चांगलीच कानउघडणी केल्याचे पाहायला मिळत आहे. आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये ८० जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. ‘आज माननीय एसपी सर नवनीत कॉवत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यातील ८० गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना एसपी ऑफिसला बोलावलेला आहे. त्यांना यावेळी समज देण्यात आली’, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली. या कारवाईचा उद्देश बीडमधील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे हा आहे. अधीक्षकांनी या व्यक्तींना भविष्यात गुन्हेगारी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाईची चेतावणी दिली. या चेतावणीमध्ये हद्दपारी, एमपीडी आणि मकोकासारख्या कठोर कारवायांचा समावेश आहे.
Published on: Feb 07, 2025 05:49 PM