जसप्रीत बुमराहचा ऑस्ट्रेलियात दौऱ्यात झालेला सर्वाधिक वापर हा टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरला आहे. पाचव्या कसोटी सामन्यात नको तेच झालं. जसप्रीत बुमराह पाठदुखीचा त्रास झाल्याने आराम दिला गेला. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचं फिट होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्याच्या फिटनेसचा अपडेट वारंवार घेतला जात आहे. 7 फेब्रुवारीला बंगळुरुत बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलेंसमध्ये त्याच्या पाठिचं स्कॅन आणि एसेसमेंट टेस्ट करण्यात आली. या तपासण्या केल्यानंतर जसप्रीत बुमराहला पुढच्या 24 तासासाठी तिथेच थांबवण्यास सांगितलं आहे. त्याला तिथेच थांबवल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं. त्याला थांबवण्याचं कारण काय? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. टाइम ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 24 तासात तपासणीचा रिझल्ट येईल. त्यानंतर त्याची दुखापत किती आहे आणि बरी झाली आहे का? याबाबत कळेल. त्यानंतर बीसीसीआयचे मेडिकल टीम कशी पद्धतीच्या उपचाराची गरज आहे ते ठरवेल.
बीसीसीआयचे मेडिकल टीम जसप्रीत बुमराहला पुढे काय ते स्पष्ट सांगेल. मैदानात पुनरागमन कधी करणार ते सांगणार आहेत. त्यामुळे रिपोर्ट येईपर्यंत जसप्रीत बुमराहला बंगळुरुत थांबण्यास सांगितलं आहे. भारतीय संघाच्या व्यवस्थापनाला याबाबत स्पष्ट माहिती दिली आहे. म्हणजेच पुढच्या 24 तासात बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार की नाही हे स्पष्ट होईल. जसप्रीत बुमराह बॉर्डर गावस्कर स्पर्धेच्या शेवटच्या सामन्यात जखमी झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत आराम करत आहे.
जसप्रीत बुमराहचं पहिलं स्कॅन जानेवारी महिन्यात करण्यात आलं होतं. न्यूझीलंडचे डॉक्टर रोवान स्काउटेन यांना हा रिपोर्ट दिला आहे. तेव्हापासून बुमराहच्या दुखापतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. आता स्कॅन रिपोर्ट आल्यानंतर बीसीसीआयची मेडिकल टीम त्यांच्याकडूनच सल्ला घेणार आहे. यापूर्वीही जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती. तेव्हा एक वर्ष मैदानापासून दूर होता. तेव्हाही डॉ. स्काउटेन यांनी हा इलाज केला होता. बुमराहशिवाय टीम इंडियाचा वेगवान मारा कमकुवत आहे. त्यामुळे त्याच्याशिवाय टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत उतरणं धाकधूक वाढवणारं आहे.