जगातील असा एकमेव देश आहे, ज्या देशात अंदाजे 30 वर्षांपूर्वी एक विचित्र व्यवसाय सुरू झाला. आता हा व्यवसाय या देशात खूप झपाट्यानं वाढत असून, सर्वात मोठा व्यवसाय बनला आहे. तुमच्याकडे फक्त पैसा पाहिजे, तुमच्याकडे जर पैसा असेल तर तुम्हाला या देशात सर्वच नाती भाड्यानं मिळतात. तुम्हाला या देशात आई-वडील, मावशी, भाऊ, बहीण, मुलगा, मुलगी एवढंच काय नवरा आणि बायको देखील भाड्यानं मिळते. इथे प्रत्येक नात्याचे रेट हे वेगवेगळे आहेत. तुम्ही त्यांना तुमच्या सोईनुसार तुम्हाला हवे तेवढे दिवस सोबत ठेवू शकतात.सध्या हा या देशाचा सर्वात मोठा उद्योग बनला आहे.
आपण जपानबद्दल बोलत आहोत. जपानमध्ये ही प्रथा अंदाजे 30 वर्षांपूर्वी सुरू झाली. जपान हा जगातील असा एकमेव देश आहे, जिथे तुम्हाला प्रत्येक नातेवाईक हवा तेवढा वेळ भाड्यानं मिळू शकतो. जपानमध्ये या व्यवसायाची सुरुवात 1990 च्या दशकामध्ये झाली.तोक्यो की नावाच्या कंपनीनं या व्यवसायाची सुरुवात केली. जे लोक एकटे राहातात त्यांचा एकटेपणा घालवण्याचा उद्देश हा व्यवसाय सुरू करण्यामागे होता. मात्र त्यानंतर हा बिझनेस जपानमध्ये प्रचंड विस्तारला.
कोणत्या कामांसाठी तुम्ही कुटुंब भाड्यानं घेऊ शकता?
सुरुवातीला ही कंपनी अशाच लोकांना आपली सेवा देत होती, जे लोक एकटे आहेत ज्यांना आधाराची गरज आहे. मात्र त्यानंतर या व्यवसायाचं स्वरूप बदललं. जर तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला पार्टनरची आवश्यकता आहे. तर इथे तुम्ही बायको किंवा नवरा भाड्यानं घेऊ शकता. जर तुम्हाला आई-वडील लागत असतील तर ते देखील तुम्हाला इथे भाड्यानं मिळतात. अनेक लोकं लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी, आपला एकटेपणा दूर करण्यासाठी अशा व्यक्ती किंवा नातेवाईक भाड्यानं घेतात.
किती असतो रेट ?
जपानमध्ये अशापद्धतीनं भाड्यानं घेतलेल्या कुटुंबाचा रेट वेगवेगळा असतो. तुम्हाला फक्त बायको भाड्यानं पाहिजे की नवरा भाड्यानं पाहिजे? आई-वडील दोघेही भाड्यानं पाहिजेत की संपूर्ण कुटुंबच भाड्यानं पाहिजे यावर त्याचा रेट अवलंबून असतो. साधारणपणे या कामासाठी जपानमध्ये एका तासाचे भाडे हे 5,000 येन पासून ते 20,000 येनपर्यंत आहे. जपानचा एक येन हा भारताच्या 0.57 रुपयांच्या बरोबर आहे.