Published on
:
07 Feb 2025, 2:32 pm
Updated on
:
07 Feb 2025, 2:32 pm
धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरनळी येथील अशोक मोहिते मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी वैजनाथ बांगर यास आज (दि.७) धारूर येथील न्यायालया समोर हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. (Beed Crime News)
केज तालुक्यातील धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील तरणळी या ठिकाणी ५ फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे व वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस? म्हणून अशोक मोहिते यास लोखंडी रॉड व कोयत्याने मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी धारूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यातील एका अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवण्यात आले आहे. तर वैजनाथ बांगर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. सरकारी वकील ॲड. एस.एन. फेरोकार व पोलीस अधिकारी देविदास वाघमोडे यांनी संशयिताची अधिक चौकशी करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. तर आरोपीकडून ॲड सुदर्शन मुंडे यांनी काम पाहिले.