महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मतदानात महाघोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. मतदारांची संख्या अचनाक वाढली कशी? असा सावल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ‘मदर ऑफ डेमोक्रेसी’ ला ‘मॅनीप्युलेटेड डेमोक्रेसी’ होऊ देणार नाही,असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ठणकावले आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाघोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पाच महिन्यांत राज्यातील मतदार यादीत 39 लाखांहून अधिक मतदारांची नावे वाढवण्यात आली आहेत. महाराष्ट्राच्या मतदार यादीत समाविष्ट केलेल्या मतदारांची एकूण संख्या हिमाचल प्रदेशातील एकूण मतदारांपेक्षा जास्त आहे, असा दावाही त्यांनी केला. या आरोपांदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की निवडणूक आयोगाने आम्हाला एक्सेल स्वरूपात एकत्रित छायाचित्र असलेली मतदार यादी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Huge discrepancies have been exposed in the voter list of Maharashtra 2024 Lok Sabha and Assembly Elections. In view of this, the Election Commission should provide us with a consolidated voter list in Excel format with photographs, which was used for voting.
This is very…
— Mallikarjun Kharge (@kharge) February 7, 2025
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी तफावत उघड झाली आहे. हे लक्षात घेता, निवडणूक आयोगाने आम्हाला एक्सेल फॉरमॅटमध्ये एकत्रित छायाचित्र असलेली मतदार यादी उपलब्ध करून द्यावी, जी मतदानासाठी वापरली गेली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर आणि लोकशाहीवरील विश्वास जपण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.