Types of Chocolates: सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे. अशातच व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी चॉकलेट डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी युगुल आपल्या जोडीदाराला एकमेकांना चॉकलेट गिफ्ट्स देतात. तसेही प्रत्येकजण हे चॉकलेट खाण्याचे शौकीन असतात. यात लहान मुलं असोत वा मोठे, सगळ्यांनाच चॉकलेट खायला आवडतं. मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार चॉकलेटचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला फायदे आणि तोटे दोन्ही परिणाम होत असतात.
पण तुम्ही चॉकलेटचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. बरं ते चॉकलेटचे फायदे आणि तोटे याबद्दल होते. पण चॉकलेटचे किती प्रकार असतात हे तुम्हाला माहित आहे का? या लेखात आम्ही तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात.
चॉकलेटचे किती प्रकार आहेत?
1. मिल्क चॉकलेट : मिल्क चॉकलेटमध्ये फक्त ४० टक्के कोको असते. त्यामुळे त्याची चव फारशी कडू नसते. मिल्क चॉकलेट बनवताना त्यात साखर, कोको आणि दूध एकत्र मिसळले जाते.
2. डार्क चॉकलेट : डार्क चॉकलेट हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. डार्क चॉकलेटचे वैशिष्ट्य म्हणजे यात दुधाचा वापर केला जात नसून यात ३० ते ८० टक्के कोको वापरले जाते. ते बनवण्यासाठी साखर, कोको बटर आणि चॉकलेट लिकरचा वापर केला जातो.
3. व्हाईट चॉकलेट : व्हाईट चॉकलेटमध्ये कोको बटरचा वापर केला जातो. हे चॉकलेट एकदम गोड असते. कारण त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते.
4. बेकिंग चॉकलेट : याचा वापर प्रामुख्याने चॉकलेट किंवा चॉकलेटचे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हे खूप कडू असते. बेकिंग चॉकलेट हे बेकिंगसाठी वापरले जाते. पण हे थेट खाल्ले जाऊ शकत नाही.
5. सेमी-स्वीट चॉकलेट : या चॉकलेटमध्ये ३५ टक्के कोको असते. बेकिंगसाठी सेमी-स्वीट चॉकलेटचाही वापर केला जातो.
6. बिटर चॉकलेट : नावाप्रमाणेच हे अत्यंत कडू चॉकलेट आहे. यात ५० ते ८० टक्के कोकोचे प्रमाण जास्त असते.
असे काही चॉकलेटचे प्रकार आहेत.मात्र यातील काही चॉकटेच प्रकार खाल्ले जातात तर काही खाल्ले जात नाही. अशातच डार्क चॉकलेटचे सेवन कमी प्रमाणात करावे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते.