भारतीय बाजारपेठेत अनेक स्मार्टफोन इलेक्ट्रिक वस्तू लाँच होत असतात. अशातच स्मार्टफोन उत्पादक विवोची कंपनी ही जरी चीनची असली तरी भारतातया कंपनीचे सर्वाधिक युजर्स आहेत. 2024 च्या चौथ्या तिमाहीत भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये विवोचा सर्वात मोठा 18% वाटा आहे. यावरून भारतात विवो कंपनीचे स्मार्टफोन युजर्सना आवडतात. कंपनी आता विवो व्ही ५० हा नवा हँडसेट भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने विवो व्ही 40 भारतात लाँच केला होता.
Vivo V50 सीरिजच्या लाँचिंगची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी कंपनी त्याच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बरीच माहिती कन्फर्म करत आहे. Vivo V50 हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये लाँच करण्यात येणार आहे. शिवाय हा अतिशय स्लिम हँडसेट असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला सुपर लार्ज बॅटरी देखील दिली जाणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या हँडसेटच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल ज्याला कंपनीने दुजोरा दिला आहे.
Vivo V50 फोनच्या सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
Vivo V50 हा स्मार्टफोन रोज रेड, स्टारी ब्लू आणि टायटॅनियम ग्रे या तीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. Vivo ने ZEISSच्या सहकार्याने त्यांच्या या फोनचा कॅमेरा सिस्टीम विकसित केला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात येणार आहे. यात 50MP ZEISS OIS मुख्य कॅमेरा आणि 50MP ZEISS अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटमध्ये 50MP ZEISS ग्रुप सेल्फी कॅमेरा असेल. फोनचा कॅमेरा लँडस्केप पोर्ट्रेट, स्ट्रीट पोर्ट्रेट आणि क्लासिक पोर्ट्रेट सारखे मोड्स देईल.
याव्यतिरिक्त, Vivo V50 फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळाले आहे. फोन अधिक सुरक्षित करण्यासाठी वर डायमंड शील्ड ग्लास लावण्यात आला आहे, जो कंपनीने जर्मन कंपनी Schott च्या सहकार्याने विकसित केला आहे. फोनमध्ये स्मार्ट AI क्षमता असेल. Vivo V50 हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित FunctouchOS 15 सह भारतीय बाजारात येणार आहे.