इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजी (आय. जी. एम.) Pudhari News Network
Published on
:
07 Feb 2025, 8:11 am
Updated on
:
07 Feb 2025, 8:11 am
भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा शासकीय रुग्णालय भिवंडी शहरा सोबतच ग्रामीण भागातील लाखो नागरिकां करीता मोफत शासकीय आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारे एकमात्र रुग्णालय. भिवंडी पालिकेच्या मालकीचे हे रुग्णालय, त्याचा आर्थिक भार उचलणे शक्य नसल्याने अखेर पालिकेनेच हे रुग्णालय 2007 मध्ये शासनाच्या हवाली केले. परंतु या रुग्णालयात रुग्णसेवाच मिळत नाही आणि त्यामुळे बर्याच वेळा या रुग्णालयात रुग्णांवर फक्त प्रथमोपचार करून थेट ठाणे आणि मुंबई येथे उपचारासाठी पाठवले जाते अशी ओरड नेहमीच केली जाते. अशी परिस्थिती काही वर्षांपूर्वी नक्कीच होती. (Indira Gandhi Memorial Hospital- Ichalkaranji इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, इचलकरंजी)
स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा व त्यास शासनाने वेळोवेळी केलेली आर्थिक मदत तर या रुग्णालयाच्या अधीक्षिका पदी डॉ माधवी पंदारे या महिला वैद्यकीय अधिकारी रुजू झाल्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार्या वैद्यकीय कर्मचार्यांनी झपाटून प्रामाणिकपणे काम केल्याने हे रुग्णालय सध्या कात टाकत असल्याने या रुग्णालयाची प्रकृती सुधारत असल्याचे या रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांची वाढलेली संख्या पाहून दिसून येत आहे.
या रुग्णालयात 2024 या संपूर्ण वर्षभरा मध्ये 2 लाख 39 हजार 412 रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागात केस पेपर काढून उपचार घेतले आहेत. जी संख्या मागील वर्षीच्या तुलनेत 52 हजार 216 ने अधिक आहे. वर्षभरात रुग्णालयात 13 हजार 632 रुग्णांना दाखल करून घेतले त्यापैकी अवघ्या 1949 रुग्णांना पुढील उपचारासाठी ठाणे मुंबई येथे पाठवले आहे अशी माहिती रुग्णालयाच्या अधीक्षका डॉ. माधवी पंदारे यांनी दिली आहे.
100 खाटांच्या या रुग्णालयात डॉ माधवी पंदारे यांनी जून मध्ये या रुग्णालयाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी स्वीकारल्या नंतर बहुसंख्य कार्यालयीन व वैद्यकीय सेवा देणार्या पदांवर महिला कर्मचारी दाखल झाल्याने त्यांनी या रुग्णालयात कायापालट करीत असतानाच रुग्णांना समाधान मिळेल अशा रुग्णसेवा देण्याचा प्रयत्न केला. रक्त तपासणी, गरोदर महिलांची सोनोग्राफी, सिटी स्कॅन, डायलेसीस, ई सी जी या सर्व तपासणी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. त्याचा वेळोवेळी रुग्णांकडून फायदा घेत या रुग्णालयात तब्बल 1 लाख 23 हजार 383 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली आहे. तर 4251 ई सी जी, 910 डायलेसीस, 2036 सोनोग्राफी, 2688 सिटी स्कॅन केल्या गेल्याची माहिती डॉ. माधवी पंदारे यांनी दिली आहे.
या रुग्णालयात भिवंडी शहरातील गोरगरीब जनता सह तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता आरोग्य सेवेसाठी अवलंबून आहेत. त्यातच महामार्गावरील अपघात वेळी सर्वप्रथम उपचार करण्यासाठी बर्याच वेळा याच रुग्णालयात आणले जातात. तर शहर ग्रामीण सह वाडा येथून प्रसूती वेळी गंभीर झालेल्या महिला ठाण्याकडे जाताना रस्त्यात भिवंडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारा व्हावेत यासाठी आग्रही असतात अशा वेळी भिवंडी रुग्णालयातील प्रसूती बाबत अनेक वेळा ओरड होत असते. पण या रुग्णालयात 3424 महिलांची प्रसूती झाली आहे. त्यामधील 418 महिलांवर प्रसूती शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत हे आपणाला नाकारता येणार नाही. भिवंडी शहर व ग्रामीण भागात श्वान दंशच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत असताना 11 हजार 211 नागरिकांना झालेल्या श्वान दंशा वर, 363 सर्प दंश तर 128 नागरिकांना झालेल्या विंचू दंशावर या रुग्णालयात उपचार झाले आहेत.