घरावर विज कोसळली; विद्युत उपकरणेही जळाली

2 hours ago 1

चिखली (Buldhana) :- रात्रीच्या वेळेत अचानक मेघ गर्जनासह पाऊस (Rain) सूरू असतांना एका घरावर वीज कोसळून घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली. या घटनेत घर मालकाचे हजारो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना १५ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.

चिखली तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसा पासून परतीच्या पावसाने मेघ गर्जनासह मुसळधार स्वरूपात जोरदार हजेरी लावली. त्यामध्ये वादळी वाऱ्याचा जोर जास्त असल्याने घरा बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यातच रात्रीची वेळ असल्याने सर्व जण घरामध्ये गार झोपेत होते. त्यात चिखली शहरातील गजानन नगरातील रहिवासी लक्ष्मण एकनाथ मलवार यांच्या घरावर रात्रीच्यावेळी अचानक विज कोसळली आणि या घटनेत घरातील विजेची उपकरणे जळून खाक झाली आहेत तसेच विजेमुळे भिंतीला तडे गेले आहेत. त्याच बरोबर आजू बाजूच्या अनेकांच्या घरातील सुध्दा विद्युत उपकरणे (Electrical equipment) जळाली असल्याची माहिती लक्ष्मण मलावर यांनी दै देशोन्नती (Deshonnati) शी तसेच तहसिलदार संतोष काकडे यांना दिली आहे ..

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article