घुसखोरांविरुद्ध धाडसी कारवाई:दोन पोलिस अधिकारी बांधकामावर सुपरवायझर, तर पाच कर्मचारी मजूर; 8 दिवस रेकी करून 8 बांगलादेशी ताब्यात

3 hours ago 2
दोन अधिकारी सुपरवायझर बनले. २ महिला कर्मचाऱ्यांसह ५ पोलिसांनी मजुराचा वेश धारण करीत आडगाव येथील एका बांधकाम साइटवरून ८ बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले. या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पथकाने सलग आठ दिवस मजुरासारखे बेमालूम वेशांतर करीत ही मोठी कारवाई केली. सध्या मालेगावसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा गाजत असताना या कारवाईने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आडगाव परिसरातील एका बांधकाम साइटवर १५० मजूर काम करत होते. त्यात काही बांगलादेशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पुणे व नाशिक शहरात १२ वर्षांपासून वास्तव्य असलेल्या एजंटची माहितीही पोलिसांनी मिळवली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण माळी व विश्वास चव्हाण हे संबंधित बांधकाम साइटवर वेशांतर करून सुपरवायझर म्हणून कामाला लागले. पोलिस कर्मचारी वैशाली घरटे, मनीषा जाधव या असिस्टंट सुपरवायझर तर इतर पोलिस कर्मचारी शेरखान पठाण, किशोर देसले, गणेश वाघ, समीर चंद्रमोरे, गौरव खांडरे हे वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालून दाढी न करता मजूर म्हणून कामाला लागले. सलग आठ दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत या सर्वांनी ५० ते ६० मजुरांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. यात रंगकाम करणाऱ्या आठ जणांची भाषा वेगळी वाटल्याने संशय बळावला. संशयितांचे मोबाइल पाहिल्यानंतर त्यांचे सर्वच नंबर बांगलादेशातील असल्याचे समजले. सर्व आठ घुसखोरांची भाषा वेगळीच असल्याने संशय खरा ठरला व त्यांना ताब्यात घेण्यात आले. या ८ घुसखोरांवर कारवाई मुख्य संशयित सुमन कलाम गाझी (२७), अब्दुला अलीम मंडल (३०), शाहीन मफिजुल मंडल (२३), लासेल नुरअली शंतर (२३), आसाद अर्शदअली मुल्ला (३०), आलीम सुआनखान मंडल (३२), अलअमीन अमीननूर शेख (२२), मोसिन मौफीजुल मुल्ला (२२) झडतीत बांगलादेशी कार्ड, जन्माचा दाखला सापडला घुसखोरांकडे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मागितला असता आठपैकी तिघांनी आधार कार्ड तर दाेघांनी ग्रामपंचायतीचा दाखला दिला बॅगेच्या झडतीत बांगलादेशी आयडी असलेले कार्ड, बांगलादेशी अक्षरात जन्माचा दाखला मिळून आला. गाझी आणि इतर दोघांकडे नारायणगाव येथील आधार कार्ड मिळून आले. चाैकशीत संपूर्ण माहिती देण्यात असमर्थ ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली. कोलकाता, आग्रा, पुणेमार्गे नाशिकमध्ये एजंट सुमन गाझी हाच मुख्य सूत्रधार असल्याचे तपासात पुढे आले आहे. गाझी गेल्या १२ वर्षांपूर्वी बांगलादेशातून काेलकाता, आग्रा, इंदूरवरून पुण्यात स्थायिक झाला. ताे बांधकाम साइटवर कामगार उपलब्ध करून देण्याचे काम करत होता. दर दाेन-चार वर्षांंनी तो शहर बदलायचा. पुण्यात राहूनच ताे सर्व नेटवर्क चालवत असल्याचा संशय आहे. या गाझीनेच या घुसखोरांना सर्वात पहिले बांगलादेशातील एजंटमार्फत भारताच्या सीमेवर आणले. तिथून भारतीय एजंटच्या मदतीने छुप्या मार्गाने हे घुसखोर कोलकाता येथे पोहाेचले. तिथून आणखी दुसऱ्या एका एजंटमार्फत या लाेकांना आग्रा येथे आणण्यात आले. आग्रा येथे काही दिवस मुक्काम ठाेकून ते पुण्यात दाखल झाले व त्यानंतर नाशिकमध्ये आले व येथेच स्थायिक होण्याचा त्यांचा इरादा होता. बांगलादेशी जाणकारालाच मजूर बनवून नेले बांधकाम साइटवरील मुकादमाकडे मजुरीच्या कामासाठी गेलो. दुसऱ्या दिवशी विटा उचलणे व माल कालवण्याचे काम मिळाले. हळूहळू तेथील कामगारांशी ओळख वाढवली. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पाचव्या दिवसांनंतर त्यांच्याकडून माहिती मिळण्यास सुरुवात झाली. घुसखोरांची हिंदी भाषा वेगळी होती. त्यामुळे एक दिवस बांगलादेशी भाषेच्या जाणकारालाच मजूर बनवून तेथे नेले. त्यानंतर आणखी खोलवर माहितीचा उलगडा झाला. - वैशाली घरटे व मनीषा जाधव, शोध पथकातील महिला पोलिस

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article