चालकाचा संशयास्पद मृत्यू ; मृतदेह घाटीमध्ये हलवला:खुलताबाद शासकीय रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

2 hours ago 1
चालकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खुलताबादच्या शासकीय रुग्णालयामध्ये नातेवाइकांनी गर्दी करून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. सदर प्रकरणाची चौकशी करून मृतदेहाचे शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयात करण्याची मागणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात हलवला असून या प्रकरणी खुलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विषयी मिळालेल्या माहितीनुसार कन्हीराम साहेबराव चव्हाण (३६, रा. शेवगा ता. जि. छत्रपती संभाजीनगर, ह. मु. हनुमाननगर छत्रपती संभाजीनगर) हे रोलर चालक आहे. कन्हीराम यांनी खुलताबाद तालुक्यातील गंदेश्वर परिसरात रस्त्याचे काम करण्यासाठी मंगळवारी रोजी सकाळी ट्रक (एमएच १६ क्यु ७७२०) या ट्रकमध्ये रोलर घेऊन लोणी गंदेश्वर रस्यावर घेऊन आले होते. या दरम्यान कन्हीराम यांना दुखापत झाली. त्यांना काहींनी उपचारासाठी खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी कन्हीराम यांना तपासून मृत घोषित केले. सदर माहिती कन्हीराम यांच्या नातेवाइकांना मिळाली. नातेवाइकांनी खुलताबाद शासकीय रुग्णालयात दाखल होऊन एकच रोष व्यक्त केला. जोपर्यंत कन्हीराम यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. खुलताबाद पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांनी पोलिस उपनिरीक्षक भालेराव, शेख जाकीर, पोलिस नाईक गवळी यांना खुलताबाद शासकीय रुग्णालयात जाऊन चौकशीचे आदेश दिले. वीज प्रवाहाच्या धक्क्याने मृत्यू की घातपात कन्हीराम चव्हाण हे रोलरसोबत ट्रकमध्ये होते. गंदेश्वरजवळ ट्रक हा जात असताना रोलरचा वरचा भागाचा विद्युत तारांना स्पर्श झाला व रोलरमध्ये करंट उतरून कन्हीराम चव्हाण हे गंभीर जखमी झाले, अशी चर्चा गंदेश्वर परिसरात सुरू होती, तर कन्हीराम चव्हाण यांचा प्रवाह उतरून नव्हे तर घातपात झाला अशी चर्चा कन्हीराम चव्हाण यांच्या नातेवाइकांत सुरू होती. दरम्यान, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. पतीचा घातपात केल्याचा पत्नीचा आरोप कन्हीराम यांच्या पत्नी वंदना चव्हाण म्हणाल्या की माझ्या पतीला मंगळवार रोजी पहाटे तीन वाजता फोन आला. नंतर सकाळी सात वाजता फोन आल्याने माझे पती हे काम करण्यासाठी घराबाहेर गेले व नंतर सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास फोन आला. तुमच्या पतीला विजेचा धक्का लागला आहे. त्यांना दुखापत झाली असून उपचारासाठी खुलताबाद शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. खुलताबाद येथे शासकीय रुग्णालयात आले असता माझे पती मृत झाल्याचे दिसून आले. माझ्या पतीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला नसुन माझ्या पतीचा घातपात झाला आहे. माझ्या पतीला उपचारासाठी खुलताबाद शासकीय रुग्णालयात घेऊन येणारी व्यक्ती व वाहन आमच्या येण्यापर्यंत का थांबले नाही म्हणून घातपाताचा संशय आहे, असा आरोप वंदना चव्हाण यांनी केला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article