संजय राऊतांनी संभाळून राहावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा

2 hours ago 1

Girish Mahajan connected Sanjay Raut : मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तसंच संजय राऊतांनी संभाळून राहावं, असं म्हणत त्यांनी इशाराही दिला आहे. तसंच अमित शाह यांच्या दौऱ्याबाबतही महाजनांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

संजय राऊतांनी संभाळून राहावं; शिंदे सरकारमधील मंत्र्याचा थेट इशारा

संजय राऊत, खासदारImage Credit source: ANI

| Updated on: Sep 25, 2024 | 12:02 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान अमित शाह भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. जेव्हा- जेव्हा अमित शाह महाराष्ट्रात येतात. तेव्हा इथले उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे नाशिककरांनी सतर्क राहावं, असं राऊत म्हणाले. त्यावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांनी सांभाळून राहावं, असं महाजन म्हणालेत.

संजय राऊतांनी जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यावरही महाजरांनी भाष्य केलं. तक्रार दाखल करायाला सांगा. काय घोटाळा आहे त्याची चौकशी करावी. संजय राऊतांनी हवेत गोळीबार करू नये. मला त्या भुखंडाबद्दल माहिती नाही. असा कोणता विषय आमच्यासमोर आला नाही.  संजय राऊतांना लोक गांभिर्यांने घेत नाहीत. उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान करण्याचं संजय राऊतांचे स्वप्न आहे. अमित शाह आले त्यामुळे संजय राऊतांना त्यांना थरकाप भरला आहे. हास्यास्पद बोलत असतात. असं कोणी कोणत्या अधिका-याला दम देतं का? संजय राऊतांनी संभाळून राहावं, असं गिरीश महाजनांनी म्हटलं.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article