चुहा टाेळीकडून अंमली पदार्थ,पिस्तुलसह 13 लाख 71 हजारांचा मुद्देमाल जप्त:पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
2 hours ago
1
माेक्क गुन्हयाच्या गंभीर प्रकरणात चुहा ऊर्फ ताैसिफ जमीर सय्यद (वय-28,रा.संताेषनगर, कात्रज,पुणे) या सराईत आराेपीस दाेन वर्ष पुणे शहरातून तडीपार करण्यात आले हाेते. परंतु साथीदारांसह ताे पुण्यात बेकायदेशीररित्या फिरत असताना त्याच्यासह चार जणांना आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन लाखांचे मेफेड्रान हा अंमली पदार्थ, एक 40 हजार रुपये किंमतीचे पिस्टल व एक काडतुस , काेयता, दाेन दुचाकी , एक कार व मेफेड्राॅन विक्रीतून मिळालेले चार लाख 80 हजार रुपये असा एकूण 13 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त र्स्मातना पाटील यांनी दिली आहे. याप्रकरणी ताैसिफ सय्यद (वय-28, रा.पुणे), सुरज राजेंद्र जाधव (35,रा.करमाळा, साेलापूर), कुणाल कमलेश जाधव (25,रा. वडगावशेरी,पुणे) व मार्कस डेव्हिड इसार (29,रा. धानाेरी,पुणे) या आराेपींना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा एक साथीदार जनाब (रा.कॅम्प,पुणे) हा पसार झाला असून त्याचा शाेध पोलिस घेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याबाबत पोलिस अंमलदार धनाजी धाेत्रे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कात्रज परिसरातील संताेषनगर येथील डिलाईट बेकरी समाेर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सराईत तडीपार करण्यात आलेला गुन्हेगार ताैफिस ऊर्फ चुहा हा त्याच्या साथीदारांसह येणार आहे. ताैसिफ याचेवर विविध गंभीर गुन्हे दाखल असून त्यास सन 2020 मध्ये एमपीडीए अंर्तगत स्थानबध्द करण्यात आले. त्यानंतर ताे कारागृहातून सुटून आल्यावर देखील त्याने गुन्हेगारी सुरु ठेवली. त्यामुळे त्यावर पोलिसांनी माेक्का कारवाई केली हाेती. या गुन्हयात शिवाजीनगर न्यायालयाचे विशेष न्यायाधथीश आर.व्ही कचरे यांनी त्यास 6 नाेव्हेंबर 2023 पासूनदाेन वर्षासाठी पुणे शहरातून तडीपार केले हाेते. परंतु त्यानंतर देखील ताे साथीदारांसह पुण्यात फिरत हाेता. आंबेगाव पोलिस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शरद झिने व पोलिस उपनिरीक्षक माेहन कळमकर यांचे पथकास काही आराेपी हे संताेषनगर परिसरात डिलाईट बेकरीसमााेर पहाटे दराेडा टाकण्याच्या उद्देशाने येणार आहे असे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सराईत गुन्हेगार ताैसिफ ऊर्फ चुहासह चारजणांना अटक केली. तसेच त्यांच्य ताब्यातून अंमली पदार्थ, पिस्टल, गुन्हयातील वाहने असा 13 लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)