छत्तीसगडच्या चार कामगारांना‎ बीड शहरामध्ये डांबून मारहाण‎:कंपनीत कामास लावतो म्हणत एजंटने आणले संभाजीनगरला‎

2 hours ago 2
छत्तीसगड येथील चार कामगारांना २३‎‎दिवसापूर्वी कंपनीत‎‎कामाला लावतो‎‎म्हणून ओडिशाच्या‎‎एंजटने संभाजीनगर‎‎येथे आणून बीड‎‎येथील बोअरवेल‎‎चालकाच्या ताब्यात‎‎देत बोअरवेल‎‎चालकाकडून त्या‎‎बदल्यात ८० हजार‎रूपये घेतले. दरम्यान कामगारांना बोअरवेलचे‎काम येत नसल्याने त्यांनी बीडमधून पळून‎जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बीड‎शहरातील नवा मोंढा रोडवरील एका खोलीत‎डांबण्यात येवून त्यांचे मोबाईल हिसकावून‎घेण्यात आले. बोअरवेलच्या मॅनेजरने केलेल्या‎मारहाणीत दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर‎बीड जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत‎ आहेत. दरम्यान, बीड येथील सामाजिक‎कार्यकर्त्यांनी चारही कामगारांची चौकशी केली‎आहे. दिनेश सियाराम मंडावी (२०), सोनु‎सोनलाल मंडावी (१६), गिरवर सारद मराई‎(३६), धिरेंद्र पुजारी (२१ रा.मु.पो.सालना‎ता.विश्रामपूर जी.कोंढागांव छत्तीसगढ) चार‎कामगारांना २३ दिवसापूर्वी कंपनीत काम‎करण्यासाठी संधी असल्याची थाप मारून‎शिवराम नावाच्या एजंटाने संभाजीनगर येथे‎विशाल खाडे (रा.नांदुरघाट ता.केज) या‎व्यक्तीच्या हवाली करत एजंट निघून गेला‎होता.त्यांनंतर चौघांना एका बोअरवेलच्या‎गाडीवर कामास ठेवण्यात आले.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article