छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेतील आरोपी चेतन पाटीलला जामीन

2 days ago 1

मालवण मधील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्धाटनानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला होता. या प्रकरणी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे व रचना सल्लागार चेतन पाटील यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी गुरुवारी चेतन पाटील यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजाराच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे घाई घाईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले होते. या पुतळ्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याचा आरोप त्यावेळी स्थानिकांनी केला होता. मात्र त्याकडे मिंधे सरकारने दुर्लक्ष केले होते. दरम्यान 26 ऑगस्ट रोजी अवघ्या आठ महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा तो पुतळा पूर्णत: कोसळला होता.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article