Published on
:
03 Feb 2025, 8:49 am
Updated on
:
03 Feb 2025, 8:49 am
जळगाव : यावल तालुक्यातील वडरी गावातील शेताजवळ हडकाई नदीच्या पुलाचे काम सुरू आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाहणी करण्यासाठी गेले असता चार जणांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यांना धक्काबुक्की केली या प्रकरणी यावल पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
यावल तालुक्यातील वड्री या गावाच्या शेत शिवारात शेत गट क्रमांक 89 जवळ हडकाई नदी आहे. येथे पुलाचे उर्वरित काम सुरू आहे. दरम्यान या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय यावल येथील सहाय्यक अभियंता केतन अशोक मोरे हे गेले होते. तेव्हा तेथे त्यांच्यासोबत संजय रशीद तडवी, शकील रशीद तडवी, रशीद रमजान तडवी यांचे नातू आणि रशीद रमजान तडवी यांची पत्नी या चार जणांनी अभियंत्यासोबत वाद घालत शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा निर्माण करून धक्काबुक्की केली. या प्रकरणी केतन मोरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करीत आहेत.