जळगाव जिल्ह्यातील काही मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या.Pudhari Photo
Published on
:
20 Nov 2024, 1:19 pm
Updated on
:
20 Nov 2024, 1:19 pm
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदारांच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. प्रशासनाने त्यांना मतदानासाठी क्रमांक देऊन गेट बंद केले.
जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजल्यानंतर मतदानाच्या रांग दिसत होत्या. यामध्ये चोपडा भडगावमध्ये सर्वाधिक रांगा लागलेल्या होत्या. तसेच मुक्ताईनगर रावेर ,जळगाव सिटी, भुसावळ आणि चोपडा या मतदारसंघांमध्ये मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे दिसून आले. मतदान केंद्रांवर कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून मतदान अधिकाऱ्यांनी मतदारांना क्रमांक दिले होते. त्यानंतर संबंधित मतदान केंद्राचे संपूर्ण गेट बंद करण्यात आले.
यावेळी पोलीस प्रशासनाने काही अनूचित घटना घडू नये म्हणून ज्या ठिकाणी मतदानाच्या रांगा लागलेल्या आहेत, त्या ठिकाणी कडोकोट बंदोबस्त लावला. तर संपूर्ण मतदान यंत्रणेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुरलीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी अंकित हे ठाण मांडून होते.