आरक्षणासाठी परभणीतील‎ तरुणाने केली आत्महत्या:जिंतूर तालुक्यातील सोस गावात झाडाला गळफास‎

4 hours ago 1
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी‎जिंतूर तालुक्यातील सोस येथील ३० ‎‎‎वर्षीय तरुणाने ‎‎‎आत्महत्या केली.‎‎ही घटना गुरुवारी‎‎ २१ रोजी रात्री‎‎उशीरा उघडकीस ‎‎‎आली. विनायक‎शिंदे असे मृताचे नाव आहे. त्याने‎चिठ्ठी लिहून शेतात झाडाला घेत‎गळफास घेतला. जिंतूर तालुक्यात‎मराठा आरक्षणासाठी ही सहावी ‎आत्महत्या आहे.‎ मराठा आरक्षणाच्या आंदोलनात‎विनायकने सहभाग घेतला होता.‎समाजाला आरक्षण मिळत नसल्याने‎तो मागील काही दिवसांपासून‎अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने‎ गावालगत असलेल्या शेतात झाडाला‎गळफास घेऊन जीवन संपवले. ही‎घटना नातेवाईकांना समजताच‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पोलिसांना घटनेची माहिती देण्यात‎आली. सहायक पोलिस निरीक्षक‎सुनील अंधारे व कर्मचाऱ्यांनी‎घटनास्थळी धाव घेत पंचनामा‎केला. शवविच्छेदन डॉ. परिहर यांनी‎केले. या प्रकरणी गोविंद शिंदे यांच्या‎खबरीवरुन चारठाणा पोलिसात‎अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात‎आली आहे. मृताच्या पश्चात पत्नी,‎दोन मुले, आई- वडील, एक भाऊ‎असा परिवार आहे. या घटनेमुळे‎सोस गावासह परिसरात तीव्र हळहळ‎व्यक्त होत आहे.‎ खिशात आढळली चिठ्ठी‎ आत्महत्येपूर्वी विनायक शिंदेने‎लिहलेली चिठ्ठी खिशात आढळली.‎निवडणुका झाल्या तरी मराठ्यांना‎आरक्षण मिळाले नाही. म्हणून मी‎स्वतः आत्महत्या करत आहे. याला‎कोणीही कारणीभूत नाही, असा‎मजकूर चिठ्ठीत लिहिला होता.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article