जळगाव | स्वस्त धान्य लाभार्थ्यांची 16 हजार नावे कमी

1 day ago 1

स्वस्त धान्य लाभार्थ्यांची 16 हजार नावे कमी file photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

29 Jan 2025, 5:59 am

Updated on

29 Jan 2025, 5:59 am

राज्य शासनाने सुरू असलेल्या अंतोदय अन्न योजना व प्रायव्हरी हाऊस होल्डर या दोन्ही योजनेमधून स्वस्त धान्य दुकानातील लाभधारकांनी गेल्या सहा महिन्यापासून लाभ घेतला नाही अशा 16269 जणांची नागरिकांची नावे कमी करण्यात आली आहे व यापुढेही अशीच पद्धत सुरू राहणार असल्याची पुरवठा विभागाकडून माहिती मिळाली आहे.

राज्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातून aay अंतोदय अन्न योजना व phh प्रायव्हरी हाऊस होल्डर या दोन योजना सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांना धान्य देण्यात येते .

जळगाव जिल्ह्यामध्ये अंतोदय अन्न योजनेमध्ये 5 लाख 60 हजार 651 नागरिक या योजनेतून लाभ घेत आहेत तर phh प्रायव्हरी हाऊस होल्डर या योजनेमध्ये पाच लाख 26 हजार 49 नागरिक लाभ घेत आहेत.

मात्र या दोन्ही योजनेमध्ये गेल्या सहा महिन्यापासून ज्यांनी धान्याची उचल केलेली नाही अशा नागरिकांची नावे व लाभधारकांची नावे हे सायलेंट आरसी च्या माध्यमातून कमी होत आहेत यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 16269 नावे कमी झालेली आहेत.

यामध्ये अंतोदय अन्न योजना याचे 2318 तर

प्रायव्हरी हाऊस होल्डर या लाभ योजनेत 13951 नावे कमी झाली आहे.

चाळीसगाव 168. 916. 1084

एरंडोल 63. 517. 580

अमळनेर 253. 1339. 1592

भडगाव 101. 487. 588

भुसावळ 160. 1379. 1539

बोदवड 34. 167. 201

चोपडा 271. 987. 1258

धरणगाव. 126. 631. 757

जळगाव 235. 2336. .2571

जामनेर. 187. 1084. 1271

मुक्ताईनगर 99. 489. 588

पाचोरा 190. 1103. 1293

पारोळा 147. 517. 664

रावेर 96. 877. 973

यावल 188. 1122. 1310

एकूण. 2318. 13915. 16269

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article