फुरसुंगीत भरधाव कंटेनरची कारला धडक:मोबाईल दुकानदारांचा जागीच मृत्यू; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल

10 hours ago 1
भरधाव कंटेनरच्या धडकेत कार चालक तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर-सासवड रस्त्यावर घडली. याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. अक्षय बाळासाहेब चिव्हे (वय 31, रा. संयाेग काॅलनी, काळेपडळ आणि अपेक्षा लाॅनजवळ, फुरसुंगी, पाॅवर हाऊसजवळ, फुरसुंगी, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आाहे. याबाबत बाळासाहेब महादेव चिव्हे (वय 59, रा. संयोग काॅलनी, काळेपडळ, हडपसर) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कंटनेर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय यांचे हडपसर भागातील काळेपडळ परिसरात मोबाइल विक्रीचे दुकान आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास अक्षय हडपसर-सासवड रस्त्यावरुन कार मधून घरी जात होते. त्यावेळी फुरसुंगीतील पाॅवर हाऊसजवळ भरधाव मालवाहून कंटेनरने कारला धडक दिली. अपघातात कारचालक अक्षय गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या अक्षय यांचा उपचारांपूर्वीच मृत्य झाल्याची माहिती काळेपडळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिली. पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव पुढील तपास करत आहेत. काॅलेजचे विद्यार्थीस भरधाव वाहनाची धडक लाेणीकाळभाेर येथील एमआयटी काॅर्नर याठिकाणी आदित्या संताेष थिटे (वय-18) हा त्याचे दाेन काॅलेज मित्रांसाेबत रस्ता ओलंडत हाेता. त्यावेळी पुणेकडून साेलापूरकडे जात असणाऱ्या एका माेटारसायकलवरील अनाेळखी इसमाने त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहन भरधाव वेगात चालवून, वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष करुन, हयगयीने, अविचाराने, बेदारकपणे चालवून विद्यार्थ्यास जाेरात धडक देऊन त्याच्या डाव्या पायाची नडगीस फ्रॅक्चर करुन ताे तेथून निघून गेला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाव लाेणीकाळभाेर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article