* 9 फेब्रुवारीला होणार परीक्षा
* परीक्षेसाठी साहित्याचे केले वाटप
हिंगोली : इयत्ता ५ वी व ८
शिष्यवृत्ती परीक्षा ही ९ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील अनेक केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ५ व ८ वीमधील १० हजार ८०४ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
इयत्ता ५ वी व ८ वी मधील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. त्या निमित्ताने ९ फेब्रुवारी रोजी २ सत्रामध्ये सकाळी ११ ते दुपारी १२.३० व दुपारी २ ते ३.३० दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी तालुका निहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे इयत्ता ५ वी करीता हिंगोली तालुक्यातील १३४४ विद्यार्थी असुन १२ केंद्र आहेत. औंढा ना. तालुक्यात १००९ विद्यार्थी असुन ९ परीक्षा केंद्र,
सेनगाव तालुक्यात ७७२ विद्यार्थी असुन १० परीक्षा केंद्र, कळमनुरी तालुक्यात १२७६ विद्यार्थी असुन १६ परीक्षा केंद्र, वसमत तालुक्यात १६९० विद्यार्थी असुन १४ परीक्षा केंद्र असे एकुण ६३६१ विद्यार्थी व ६१ परीक्षा केंद्र स्थापीत करण्यात आले आहेत. ८ वीमध्ये हिंगोली तालुक्यात १०८६ विद्यार्थी व ९ केंद्र, औंढा ना. तालुक्यात ५६६ विद्यार्थी व ६ केंद्र, सेनगाव तालुक्यात ५८८ विद्यार्थी व ९ केंद्र, कळमनुरी तालुक्यात १११९ विद्यार्थी व १४ केंद्र, वसमत तालुक्यात १०८४ विद्यार्थी व १० परीक्षा केंद्र अशा एकुण ४४४३ विद्यार्थ्यांसाठी ४८ परीक्षा केंद्र स्थापित केले आहेत. परीक्षेसाठी ६ फेब्रुवारी रोजी साहित्य वाटप करण्यात आले असुन परीक्षेसाठी जि.प. शिक्षण विभागातर्फे जय्यत तयारी केली आहे.