Published on
:
20 Nov 2024, 6:35 pm
Updated on
:
20 Nov 2024, 6:35 pm
नवी दिल्ली : झारखंड विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात ३८ जागांसाठी मतदान पार पडले. मतदान संपल्यानंतर एकूण ६८.४५ टक्के मतदान झाले. राजमहल, बोरियो, बरहेट आदी मतदारसंघात आज मतदान पार पडले. या टप्प्यामध्ये झामुमोचे नेते व मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे बरहेट मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन या गांडेय विधानसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. नक्षलग्रस्त गिरिडीह जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी यावेळी वाढलेली आहे.
या टप्प्यात एकूण ५२८ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मते, ५ वाजेपर्यंत जामतारा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ७६.१६ टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान बोकारो जिल्ह्यामध्ये ६०.९७ टक्के झाले आहे. या टप्प्यात एकूण १४,२१८ मतदान केंद्रे आहेत. यामध्ये २३९ मतदान केंद्रावर संपूर्ण महिला अधिकाऱ्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.
बोकारो : 60.97 टक्के
देवघर : 72.46 टक्के
धनबाद : 63.39 टक्के
दुमका : 71.74 टक्के
गिरिडीह : 65.89 टक्के
गोड्डा : 67.24 टक्के
हजारीबाग : 64.41 टक्के
जामतारा : 76.16 टक्के
पाकूर : 75.88 टक्के