लेबनॉनवर इस्रायलचा आणखी एक विनाशकारी हल्ला, ४७ लोक ठारFile Photo
Published on
:
22 Nov 2024, 3:48 am
Updated on
:
22 Nov 2024, 3:48 am
पुढारी ऑनलाईन :
पूर्व लेबनॉन मध्ये इस्रायलने आणखी एक मोठा हल्ला केल्याचे समोर आले आहे. गुरूवारी केलेल्या हल्ल्यात कमीत-कमी ४७ लोक मारले गेले आहेत. एका लेबनॉनी अधिकाऱ्याने सांगितले की, युद्धविराम चर्चा पुढे नेण्यासाठी इराण-समर्थित हिजबुल्लाह गटाच्या विरोधात कारवाई वाढवण्यासाठी अमेरिकेच्या मध्यस्थांकडून इस्रायलवर दबाव आणला जात आहे. दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांची भेट घेतली. मात्र त्यांच्याकडून तातडीने कोणतेही वक्तव्य आले नाही. (Israel-Hezbollah War)
यावरून असे दिसून येते की, युद्ध विरामासाठीच्या चर्चेदरम्यान अजुन काही गोष्टींचा अडथळा आहे जो दूर होणे बाकी आहे. एका वरिष्ठ लेबनीज अधिकाऱ्याने रॉयटर्सला सांगितले की बेरूतने दक्षिण लेबनॉनमधून इस्रायली सैन्याची लवकर माघार सुनिश्चित करण्यासह यूएस युद्धविराम प्रस्तावात बदल करण्याची मागणी केली आहे. इस्रायल आणि सशस्त्र, इराण-समर्थित हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हा सर्वात गंभीर प्रयत्न आहे, जो एक वर्षापूर्वी सुरू झालेल्या गाझा युद्धाच्या प्रादेशिक स्पिलओव्हरचा भाग आहे.