​​​​​​​महायुती सत्तेत आल्यास पुन्हा शिंदेच मुख्यमंत्री?:शिवसेना नेत्यांची जोरदार मोर्चेबांधणी; भाजपनेही स्थिती पाहून घेतली लवचिक भूमिका

6 hours ago 1
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार आल्यास पुन्हा एकदा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यातच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल असे विधान केल्यामुळे भाजपनेही स्थितीनुसार लवचिक भूमिका घेतल्याचा दावा केला जात आहे. तूर्त मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत महाविकास आघाडीसारखीच जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीनंतर सर्वच संस्थांचे एक्झिट पोल्स जाहीर झाले. त्यात राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाट यांनी यासंबंधी आपल्या पक्षाची जोरकसपणे बाजू मांडली आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांच्या चेहऱ्यावर जनतेला मते मागितली. राज्यातील जनतेनेही त्यांच्या चेहऱ्याला पसंती दर्शवली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर त्यांचाच पहिला अधिकार असून, निकालानंतर तेच मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शिंदे सीएम झाले तर आम्हाला आनंदच आहे त्यांच्या या विधानावर भाजप नेते तथा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. पण निवडणुकीनंतर महायुतीचे तिन्ही घटकपक्षांचे प्रमुख एकत्र बसून चर्चा करून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर आम्हाला आनंदच आहे. एवढेच नाही तर त्यांच्या जागी दुसरा एखादा नेता त्या पदावर बसला तरी आम्हाला आनंदच आहे. ही गोष्ट महायुतीच्या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते ठरवतील, असे ते म्हणाले. शिंदे हेच सरकारचे प्रमुख व्हावेत दुसरीकडे, शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही मंगलप्रभात लोढा यांच्या भूमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महिला, शेतकरी, तरुणांसह सर्वच मतदारांचा प्रतिसाद व एक्झिट पोलचे अंदाज पाहून कुणाचे सरकार येणार हे स्पष्ट झाले आहे. माझ्या मते महायुतीला बहुमतापेक्षा जास्त जागा मिळतील. राहिला प्रश्न सरकारचे नेतृत्व कोण करणार? याचा तर तिन्ही प्रमुख पक्षांचे ज्येष्ठ नेते एकत्र बसून त्यावर निर्णय घेतली. मित्रपक्षांनी देखील ही गोष्ट स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसतील व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. शिवसेनेचीही हीच भूमिका आहे. शिवसेना म्हणून किंवा शंभूराज देसाई म्हणून तुम्ही माझे वैयक्तिक मत विचारले, तर मी सांगेन की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत. आम्हा सर्वांना असे वाटते. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद भेटले तर आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हेच सरकारचे प्रमुख व्हावेत असे मला वाटते, असे ते म्हणाले. हे ही वाचा... उद्या येणार जनतेच्या कोर्टाचा फैसला:महाराष्ट्राचे सत्ता 'केंद्र' कोणत्या नेत्याभोवती फिरणार? उद्धव ठाकरे, अजित पवार की एकनाथ शिंदे? मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर जनतेचा कौल आता ईव्हीएम बंद झाला आहे. उद्या निवडणूक आयोगाचे कर्मचारी जनतेचा फैसला सुनावतील. अवघ्या काही तासांवर आलेला हा जनादेश कसा असेल? हे कुणालाच ठावूक असणार नाही. पण महाराष्ट्राच्या सत्तेचे केंद्र उद्धव ठाकरे, अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या तिघांभोवतीच फिरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वाचा सविस्तर

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article