हिंगोलीतील 3 विधानसभांचा निकाल:सकाळी 10 पर्यंत पहिल्या फेरीचा निकाल येणार; दुपारी 1 पर्यंत अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता

5 hours ago 1
हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या फेरीचा निकाल जाहिर होणार असून दुपारी एकवाजेपर्यंत जय पराजयाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली येथे अौद्योगिक वसाहतीमधील शासकिय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणी होईल. वसमत येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तर कळमनुरी येथे तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात १४ टेबल लावण्यात आले असून सुमारे १२५ पेक्षा अधिक कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे मतमोजणीवर लक्ष असणार आहे. हिंगोलीत उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, कळमनुरीत प्रतिक्षा भुते तर वसमतमध्ये विकास माने यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून पहिल्या टप्प्यात टपाली मतदानाची मोजणी केली जाणार आहे. टपाली मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभेसाठी १० टेबल असून त्यानंतर प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबलवर मतदान यंत्रावरील मतमोजणी होणार असून पहिली फेरी पूर्ण होण्यासाठी किमान १० वाजण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतरच्या फेऱ्या अधिक गतीने पूर्ण होतील. टपाली मतमोजणीसाठी सहाय्यक मतमोजणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या मतदार संघात किती फेऱ्या दरम्यान, मतमोजणीच्या फेरीनिहाय निकाल जाहिर केला जाणार आहे. वसमत येथे ३२८ मतदान केंद्राच्या २४ फेऱ्या होणार असून कळमनुरीत ३५२ मतदान केंद्राच्या २६ फेऱ्या तर हिंगोलीत ३४५ मतदान केंद्राच्या २५ होणार असून एकूण ७५ फेऱ्यांमधून मतमोजणी होणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वसमत विधानसभा मतदार संघात २ लाख ४० हजार ७३७ मतदान झाले असून कळमनुरीत २ लाख ४३ हजार ४९० तर हिंगोली विधानसभा मतदार संघात २ लाख २७ हजार २०२ मतदारांनी मतदान केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article