टेंभुर्णी येथे पोलिसांकडून 2 लाख 63 हजारांचा गांजा जप्त

3 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

09 Oct 2024, 4:29 pm

Updated on

09 Oct 2024, 4:29 pm

टेंभुर्णी : टेंभुर्णी शहरात करमाळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी व टेंभुर्णी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने टेंभुर्णी शहरात धाड टाकून गांजा व इतर साहित्य असा एकूण 2 लाख ६३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि.8) करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी शहरात गांजाची तस्करी होत असल्याची माहिती करमाळा उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकातील पोसई हनुमंत वाघमारे त्यांचे सहकारी व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोनि दीपक पाटील यांच्या पथकाने सयुंक्तपणे कारवाई करून टेंभुर्णी (ता.माढा) येथील सिध्दार्थनगर मधील सुरज बबन लोंढे याच्या घरी (घर नंबर -११४५) धाड टाकली. तेथे लोंढे याच्या राहत्या घरात पोलिसांना हिरवट व काळपट रंगाचा उग्र वासाचा गुंगी आणणारा मादक पदार्थ १३ किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी तो गांजा ताब्यात घेऊन रीतसर जप्त केला आहे. त्याची वीस हजार रुपये कि.ग्रॅ.प्रमाणे २ लाख ६० हजार रूपये किमंत होत आहे.तसेच गांजा बरोबर वजनकाटा,प्लास्टिक पिशव्या असे इतर तीन हजार रुपये किमतीचे साहित्य ही पोलिसांनी जप्त केले आहे.

टेंभुर्णी शहरात पोलिसांनी धाड टाकून गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.टेंभुर्णी शहरात अवैध व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत असून पोलिसांनी हे अवैध व्यवसाय तातडीने बंद करावेत अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे. याबाबत पोसई हनुमंत झुंबर वाघमारे (वय-३४) यांच्या फिर्यादीवरून एपीआय गिरीष जोग यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोसई अजित मोरे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article