Published on
:
15 Nov 2024, 7:10 am
Updated on
:
15 Nov 2024, 7:10 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक आणि सीईओ पावेल दुरोव्ह (Telegram CEO Pavel Durov) हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी कारण थोडे अजब आहे. ज्या महिलांना IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) द्वारे मुलांना जन्म देवू इच्छितात त्यांना त्याचे शुक्राणू (स्पर्म) मोफद देणार असून त्याचबरोबर ही ऑफर स्वीकारणार्या महिलांच्या IVFचा खर्चही ते स्वत:च करणार आहेत.
मी १२ देशांधील शंभरहून अधिक मुलांचा जैविक पिता (Biological Father) असल्याचा दावा करत जुलै २०२४ मध्ये दुरोव्ह यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. आता त्यांनी IVF (इन विट्रो फर्टिलायझेशन) द्वारे मुलांना जन्म देवू इच्छिणार्या महिलांना त्याचे शुक्राणू (स्पर्म) मोफत देणार असल्याचेही जाहीर करुन त्यांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.शुक्राणू दानाची घोषणा करताना, क्लिनिकच्या अधिकृत वेबसाइटने म्हटलं आहे की, “आम्हाला तुम्हाला एक अनोखी संधी देताना आनंद होत आहे! फक्त आमच्या क्लिनिकमध्ये तुम्ही आमच्या काळातील सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी उद्योजक पावेल दुरोव्ह यांच्या शुक्राणूंचा वापर करून विनामूल्य IVF करू शकता."
पावेल दुरोव्ह १५ वर्षांपासून करत आहेत शुक्राणू दान
जुलै २०२४ मध्ये पावेल दुरोव्ह यांनी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मी १५ वर्षांपूर्वी शुक्राणू दान करण्यास सुरुवात केली होती. पंधरा वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने मला एक विचित्र विनंती केली होती. प्रजनन समस्यांमुळे त्याला आणि त्याच्या पत्नीला मुले होऊ शकत नव्हते. मला एका क्लिनिकमध्ये शुक्राणू दान करण्यास सांगितले जेणेकरून त्यांना मूल होईल. मी हसायला लागलो, पण नंतर मला समजले की तो खरोखर गंभीर आहे. मागील १५ वर्षांपासून मी शुक्राणू दान करत आहेत. २०२४ पर्यंतच्या प्रवासात माझ्या शुक्राणू दानामुळे १२ देशांतील शंभरहून अधिक जोडप्यांना मूल होण्यास मदत झाली आहे. शिवाय, मी दाता बनल्यानंतर अनेक वर्षांनी, किमान एका IVF क्लिनिकमध्ये अजूनही माझे शुक्राणू मुले होऊ इच्छिणाऱ्या कुटुंबांसाठी अज्ञातपणे वापरण्यासाठी उपलब्ध आहेत.
पावेल दुरोव्ह हे मूळचे रशियाचे. त्याचे शिक्षण सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात झाले. येथेच त्यांनी व्हीकॉन्टाक्टे' नावाच्या ॲप लाँच केले. अल्पावधीत हे ॲप रशियात लोकप्रिय झाले होते. मात्र या ॲपच्या वापरकर्त्यांची माहिती देण्यासाठी रशियाच्या सरकारने त्यांच्यावर दबाव टाकला होता. त्यामुळे त्यांनी रशिया सोडला. त्यांच्याकडे फ्रान्स आणि यूएईचे नागरिकत्वदेखील आहे.
अल्पावधीत टेलीग्राफ ॲप लोकप्रिय
१४ ऑगस्ट २०१३ रोजी पावेल आणि त्यांच्या भावाने टेलीग्रामची स्थापना केली. हे ॲप वापरकर्त्यांच्या गोपनीयतेला केंद्रस्थानी ठेवणारे आहे, असे सांगण्यात आले. अल्पावधीच या या ॲपने सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया ॲप व्हॉट्सॲपसमोर स्पर्धा निर्माण केली. २०२४ च्या प्रारंभी ९०० दशलक्ष वापरकर्त्यांसह टेलीग्राम ॲप जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडिया ॲप्सपैकी एक ठरले आहे. आता त्यांच्याकडे रशियन नागरिकत्व आहे की नाही हे स्पष्ट नाही. फ्रेंच वृत्तपत्र ‘ले मोंडे’नुसार, फ्रान्समधील ले बोर्जेट विमानतळावरून दुरोव्ह यांना अटक करण्यात आली. अमली पदार्थांची तस्करी, दहशतवादाचे समर्थन व सायबर स्टॉकिंगशी संबंधित असंख्य प्रकरणांमध्ये टेलीग्रामचा सहभाग असल्याच्या अशा अनेक आरोपांखाली ही अटक करण्यात आली होती. दुरोव्ह यांनी देखील तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध अटकेची कारवाई करण्यात आली होती. एप्रिल २०२४ मध्ये दुरोव्ह यांनी दावा केला होता की, जगभरातील अनेक सरकारांनी ॲपवर नियंत्रण आणावे, यासाठी त्यांच्यावर दबाव आणला आहे. मात्र मी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आपल्या भूमिकेवर तटस्थ आहे.