उल्हासनगरच्या टेकडीवर सापडला चिमुकलीचा मृतदेहPudhari File Photo
Published on
:
22 Nov 2024, 7:04 am
Updated on
:
22 Nov 2024, 7:04 am
उल्हासनगर : तीन दिवसांपासून हरवलेल्या एका तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृतदेह हिललाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडी झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
उल्हासनगर कॅम्प पाचमध्ये तीन वर्षाची चिमुकली ही कुटुंबासह राहत होती. तीन दिवसांपूर्वी ती हरवल्याची तक्रार कुटुंबियांनी हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल केली होती. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत व्यस्त असतानाही पोलिसांनी चिमुकलीचा शोध सुरू केला होता. मात्र आज दुपारी हिललाईन पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या टेकडीवरील झाडीझुडपातून दुर्गंधी येत असून अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. हा मृतदेह हरवलेल्या चिमुकलीचा असल्याची ओळख तिच्या कुटुंबीयांनी पटवल्याची माहिती मिळत आहे.