Published on
:
16 Nov 2024, 6:04 am
Updated on
:
16 Nov 2024, 6:04 am
भिवंडी : सद्यस्थितीत राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मतदानाचे राष्ट्रीय कामावर व्यस्त असून कर्तव्यावर आहेत. अशातच मतदान झाल्यानंतर दुसर्या दिवशी कर्मचार्यांना त्यांच्या नियमित कामावर पुन्हा रुजू व्हावे लागते. परंतु देशाच्या निवडणूक आयोगाने मतदानाच्या दुसर्या दिवशी अशा कर्मचार्यांना सुट्टी देण्यात यावी, अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने कार्यवाही करावी, अशी मागणी शिक्षण क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष सुधीर घागस, राज्य पुरस्कार प्राप्त मनोज महाजन व ठाणे महानगर अध्यक्ष किशोर राठोड यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संबंधित अधिकारी, कर्मचार्यांना मतदान प्रक्रियेसाठी मतदानाच्या एका दिवसापूर्वी मतदान केंद्रावर हजर राहावे लागते, त्यानंतर मतदान संबंधी कार्यवाही करावी लागते. दुसर्या दिवशी सकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान कर्मचारी व अधिकार्यांना थांबावे लागते. यानंतर पूर्ण सोपस्कार पार पडल्यानंतर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवाव्या लागतात. त्यामुळे दुसर्या दिवशी संबंधित कर्मचारी व अधिकार्यांना सुट्टी अत्यावश्यक आहे.मुख्य निवडणूक आयोगाने असे निर्देश दिले आहेत की, जर मतदानाची तारीख 15 डिसेंबर असेल आणि पीठासीन अधिकारी, मतदान अधिकार्यांनी 15/16 डिसेंबर रोजी मतदान केलेल्या मतपेट्या इत्यादी प्राप्त केंद्रावर पोहोचल्या तर, अशा सात ते अधिकार्यांना त्यांच्या सामान्य स्थितीपेक्षा गैरहजर मानले जाणार नाही.16 डिसेंबर रोजी त्यांनी त्यांच्या ड्यूटीसाठी रिपोर्ट न केल्यास 17 डिसेंबर रोजी त्यांच्या सामान्य स्थितीसाठी अहवाल द्या.ज्या भागात प्रवासाचा कालावधी जास्त आहे, त्या ठिकाणी यासाठी योग्य भत्ता दिला जाईल आणि मतदान साहित्य जमा केल्याच्या तारखेनंतरचा दिवस आदी कर्तव्य कालावधी म्हणून गृहीत धरण्यात येईल.