कळवण : पुनद खोऱ्यातील प्रचार दाैऱ्याप्रसंगी मतदारांशी संवाद साधताना आमदार नितीन पवार.
Published on
:
16 Nov 2024, 8:25 am
Updated on
:
16 Nov 2024, 8:25 am
नाशिक : कळवण - सुरगाणा मतदारसंघात केेलेल्या विकासकामांमुळे जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मतदारसंघातील विकासकामांमुळे विरोधकांकडे उत्तर नसल्याने ते बेताल वक्तव्य करत आहेत, असा आरोप आमदार नितीन पवार यांनी केला. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कळवण - सुरगाण्यातील विकास त्यांच्या मनात रुतत असून, जनताच मतपेटीतून त्यांना उत्तर देईल, असा विश्वासही पवार यांनी पुनद खोरे परिसरातील प्रचार दाैऱ्याप्रसंगी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचे उमेदवार आ. नितीन पवार यांनी कळवण तालुक्यातील पिळकोस, चाचेर, भादवण, धनगरपाडा, वारीपाडा, विसापूर, बिजोरे, गांगवण, ककाणे, खेडगाव, रवळजी, मोकभणगी, देसराणे, जयदर, ढेकाळे, जामणे, बालापूर, गोळाखाल, हिंगळवाडी, एकलहरे, नाकोडे, पाटविहीर आदी गावांमध्ये प्रचारदौरा केला. यावेळी आ. पवार यांच्या हातून या मतदारसंघाचे भविष्य घडवायचे आहे. कळवण - सुरगाणाच्या भविष्यासाठी त्यांना बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन देसराणेचे महेंद्र हिरे व भावराव हिरे यांनी मतदारांना केले.
कळवण - सुरगाणा शहरी व ग्रामीण मतदारसंघात आ. नितीन पवार यांचा झंझावाती प्रचार सुरू असून, प्रचारात त्यांनी आघाडी घेतली. विविध गावांमध्ये त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे. महिला वर्गाकडून त्यांचे औक्षण करण्यात येत असून, कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी व फटाक्यांच्या आतषबाजी करून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी गावागावांमधील मायबाप जनतेकडून पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला जात आहे. प्रचार दाैऱ्याप्रसंगी पवार हे जनतेशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी समजून घेत आहेत. तसेच पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती जनतेला देत आहेत.
प्रचार दाैऱ्याप्रसंगी नगराध्यक्ष कौतिक पगार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, मोहन जाधव, बाळासाहेब जाधव, रिपाइंचे तालुकाध्यक्ष बापू जगताप, भारत गांगूर्डे, शीतलकुमार अहिरे, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, दीपक भालेराव, बापू गायकवाड, सुभाष पगार, ॲड. हिरामण वाघ, पोपट चौरे, दौलत चौरे, तानाजी वाघ, प्रकाश भामरे, नंदलाल गांगुर्डे, रामा पवार, रमेश भालेराव, निंबा भालेराव, देसराणेचे महेंद्र आबा हिरे, जवाहरलाल हिरे, संतोष हिरे, विनोद हिरे, जिभाऊ हिरे, सचिन देवघरे, महादू हिरे, शशी हिरे, सखाराम बहिरम, अंबादास पवार यांच्यासह बहुसंख्येने महिला, पुरुष तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत.
--------------
फोटो नितीन पवार कळवण नावाने सिटीवनमध्ये....