Published on
:
16 Nov 2024, 10:57 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:57 am
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी वर्कलाइफ बॅलन्सबाबत पुन्हा एकदा विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर वर्कलाइफ बॅलन्सबाबत पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले आहे. मूर्ती यांनी यापूर्वी आठवड्यातून 70 तास काम करण्यावर विधान केले होते. (Narayan Murthy)
त्यांच्या याच विधानाचा बचाव करत ते म्हणाले की भारताच्या समृद्धीसाठी कठोर परिश्रम आवश्यक आहेत.
CNBC ग्लोबल लीडरशिप समिटमध्ये आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या त्यांच्या विधानावर नारायण मूर्ती म्हणाले, 'मला माफ करा, माझे मत बदललेले नाही. मी मरेपर्यंत माझ्या विधानावर ठाम राहीन.
भारताच्या विकासासाठी त्यागाची गरज आहे, विश्रांतीची नाही.
1986 मध्ये भारताने सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्यावरून पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यात स्थलांतर केल्यामुळे ते "निराश" झाल्याचे नारायण मूर्ती यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले भारताच्या विकासासाठी त्यागाची गरज आहे, विश्रांतीची गरज नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देऊन ते म्हणाले, "जेव्हा पंतप्रधान मोदी 100 तास काम करत आहेत, तेव्हा आपल्या आजूबाजूला प्रगती होत आहे. याबद्दल कौतुक करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे तितकेच कठोर परिश्रम करणे."
यशाचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम
नारायण मूर्ती यांनी वर्क एथिकबद्दल त्यांचे वैयक्तिक मत देखील शेअर केले. ते म्हणले की, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी दिवसचे 14-तासचे वेळापत्रक ठेवले होते. ते सकाळी 6.30 वाजता ऑफिसला पोहोचायचे आणि रात्री 8.40 च्या सुमारास ऑफिसमधून परतायचे. ते पुढे म्हणाले ‘मला याचा अभिमान आहे.’
यशाचा एकमेव मार्ग म्हणजे कठोर परिश्रम असे 78 वर्षीय नारायण मूर्ती यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘या देशात आपल्याला कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. मेहनतीला पर्याय नाही. जरी तुम्ही सर्वात हुशार व्यक्ती असाल, तरीही तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.