दोन लाखांपेक्षा अधिक तरुणांना रोजगार निर्मिती करून देणार : सुरेश सोनवणे pudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 10:51 am
Updated on
:
16 Nov 2024, 10:51 am
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पुढील पाच वर्षांत एमआयडीसीतून मतदारसंघातील दोन लाखांपेक्षा जास्त तरुणांना रोजगार निर्मिती करून देणार असल्याचे आश्वासन अपक्ष उमेदवार डॉ. सुरेश सोनवणे यांनी शुक्रवारी (दि.१५) मतदारांशी संवाद साधताना दिले.
तालुक्यात विकास हा दिसत नाही. रोजगाराचीही बिकट अवस्था झाली असून असंख्य तरुण बेरोजगार असल्यामुळे व्यसनाधीन होत आहेत. मी अनेक उद्योजकांशी बोललो असून ते तरुणांना नोकऱ्या देण्यास सकारात्मक आहेत. परंतु आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक कंपनी मालकांकडून हप्ते वसूल केले. यांच्या दमदाट्यामुळे अनेक कंपनीमालक नाराजगी दर्शवत असल्याचे चित्र मी बघितले आहे. मला आपण पुढील पाच वर्षे आपली सेवा करण्याची संधी द्या. मी दोन लाखांपेक्षा जास्त तरुणांना नोकऱ्या मिळून देतो, असे सागितले.
सतीश चव्हाण यांच्यावरही टीका करताना त्यांनी चव्हाण यांचा चेहराही मतदारसंघाला माहिती नव्हता. अचानक निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मतदारसंघात फिरून मी विकास करतो, अशा भूलथापा देत मतदारांची दिशाभूल सुरू केले आहे. हीच योग्य वेळ असून कोणत्याही भुल-थापांना बळी न पडता योग्य चेहऱ्याला मतदान करण्याचे आवाहन सोनवणे यांनी केले.
दरम्यान सोनवणे यांनी शुक्रवारी आसेगाव, गवळीशिवरा, शिल्लेगाव, जांभळा, टाकळी, पोटुळ, नारायणपूर, लांजी आदी गावांना भेट देत मतदारांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.