ठाणे सिव्हील रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पोष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जात आहे. Pudhari News network
Published on
:
22 Nov 2024, 8:30 am
Updated on
:
22 Nov 2024, 8:30 am
ठाणे : लहान मुलांना बाहेरचे चटपटीत पदार्थ खाऊ घालून पालक वर्ग मुलांच्या आरोग्याशी खेळत असला तरी ठाणे सिव्हील रुग्णालयात येणार्या बालकांसाठी खाऊचा कोपरा ही नाविण्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली आहे. रुग्णालयातील छोट्या जागेत मुलांना पोष्टिक आहार खाऊच्या माध्यमातून दिला जाणार असून, विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस त्यासोबत फळे देण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, भुलतज्ञ डॉ. प्रियांका महंगाडे, डॉ. अर्चना पवार, बालरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश वानखेडे, डॉ गोपणपल्लिकर, विनोद जोशी, अधिसेविका प्रतिभा बर्डे आदी उपस्थित होते.
खाऊचा कोपर्यात काय असणार
रुग्णालयातील वॉर्डच्या एका कोपर्यात सकस व पौष्टिक आहार उपलब्ध करून दिला आहे. मुलांना त्याच्या आवडीप्रमाणे खाऊ निवडून खाणे शक्य होईल. खाऊच्या कोपर्यात विविध बरण्यांमध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाणे, चिवडा, चिक्की असे जिन्नस भरले व त्यासोबत फळेही ठेवण्यात येणार आहे.
ठाणे सिव्हील रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचारासाठी येत असतो. काहीवेळा या रुग्णांबरोबर छोटी मुलं देखील असतात. या लहान मुलांना भूक लागलीच तर बाहेरचे खाद्य पदार्थ खाऊ घातले जातात. मात्र असे खाद्य पदार्थ मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हाच धागा पकडून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात खाऊचा कोपरा ही संकल्पना राबवली असल्याची माहिती आहार तज्ज्ञ डॉ.शीतल नागरे यांनी दिले.
रुग्णालयात फिरताना अनेकदा लाहान मुलांच्या हातात वडापाव, चायनीज किंवा अस काही तरी खाताना दिसून आली. यावेळी राऊंड घेताना रुग्णालयाच्या आहार तज्ञ डॉ शितल नागरे यांच्या लक्षात आले व जेवणा व्यतिरिक्त मुलांना पौष्टिक आहार मधल्या वेळेत खाऊच्या कोपरा माध्यमातुन देता येईल आणि ही माहिती डॉ. कैलास पवार यांना सांगताच त्यांनी खाऊचा कोपरा सुरू करण्याची परवानगी दिली.